सध्या जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेतील आता बरेच कलाकार नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या मालिकेतील अवनी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री साक्षी गांधी लवकरच नव्या मालिकेतून नव्या रुपात झळकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – व्हॅनिटी व्हॅन नसल्यामुळे परदेशात ‘या’ अडथळ्यांना सामोर जावं लागतं, प्राजक्ता माळीने सांगितला अनुभव, म्हणाली…

काही दिवसांपूर्वी ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील सरू म्हणजेच अभिनेत्री नंदिता पाटकरने नव्या लघुपटातून भेटीस येणार असल्याची माहिती चाहत्यांनी दिली होती. ‘बटर चिकन’ हा तिचा लघुपट १५ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. त्यानंतर आता ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील साक्षी गांधीने तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.

हेही वाचा – “माझी मुलगी सुरक्षित, ती भारतात…”; इस्रायलमध्ये अडकलेल्या नुसरत भरुचाच्या आईची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘नवी जन्मेन मी…’ या मालिकेतून साक्षी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा प्रोमो काल (७ ऑक्टोबर) प्रदर्शित झाला. या प्रोमोमध्ये साक्षी जरी दिसत नसली तरी या मालिकेत ती झळकणार आहे. या मालिकेत अभिनेत्री शिल्पा ठाकरेची भूमिका केंद्रस्थानी असणार आहे. शिवाय ‘नवी जन्मेन मी…’ या मालिकेतून ‘राजा रानीचं गं जोडी’ फेम मनिराज पवार बऱ्याच कालावधीनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

हेही वाचा – अविनाश नारकरांना नेटकरी म्हणाला ‘आजोबा’, ऐश्वर्या नारकरांनी दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाल्या…

हेही वाचा – Video: दादा कोंडकेंच्या गाण्यावर अंशुमन विचारेचा बायकोबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

‘सन मराठी’वरील ही नवी मालिका कधी पासून प्रसारित होणार? हे येत्या काळात समजेल. पण या मालिकेच्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहेत.