‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘सहकुटुंब सहपरिवार’. एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेल्या या मालिकेने साडे तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील अंजी, पशा, सूर्या दादा, सुरू, वैभ्या, अवनी, ओंकार ही पात्र घराघरात पोहोचली. २०२० साली प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या या मोरे कुटुंबियांनी प्रेक्षकांची अक्षरशः मनं जिंकून घेतली.

तसंच नवनवीन ट्विस्टमुळे ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं होतं. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीमध्येही मालिका मागे नव्हती. मात्र कथा पूर्ण झाल्यामुळे ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेने १००० भाग पूर्ण करून प्रेक्षकांचा गेल्यावर्षी निरोप घेतला. याच मालिकेतील कलाकार आता विविध भूमिकांमध्ये वेगवेगळ्या मालिकेत पाहायला मिळत आहेत. अशातच मालिकेच्या कलाकारांची ग्रेट भेट झाली. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे? जाणून घ्या…

हेही वाचा – “…आणि हे घडलं”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं…”

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत अभिनेते सुनील बर्वे ( सूर्या दादा ), नंदिता पाटकर ( सुरू ), अमेय बर्वे ( वैभव मोरे ), साक्षी गांधी ( अवनी ), आकाश नलावडे ( प्रशांत मोरे ), आकाश शिंदे ( ओंकार मोरे ), कोमल कुंभार ( अंजली ), पूजा पुरंदरे ( पूजा मोरे ) असे अनेक कलाकार पाहायला मिळाले होते. या कलाकारांनी आपापली भूमिका उत्कृष्टरित्या निभावल्यामुळे अजूनही चर्चेत असतात. नुकतंच ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील कलाकारांची ग्रेट भेट झाली. याचा फोटो अमेय बर्वेने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा – Video: “जरी ती बोल्ड असली तरी…”, शिव ठाकरेने पूनम पांडेच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पापाराझींना सुनावलं; म्हणाला…

अमेयने शेअर केलेल्या फोटोमध्ये सुनील बर्वेंसह, नंदिता, पूजा, साक्षी, आकाश नलावडे, आकाश शिंदे पाहायला मिळत आहे. ही भेट एका खास निमित्ताने झाली. ते म्हणजे अमेय बर्वे लवकरच नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सावली होईन सुखाची’ मालिकेच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. या नव्या पर्वात अमेयसह अभिनेत्री प्रतीक्षा पोकळे झळकणार आहे. याच निमित्ताने अमेयला शुभेच्छा देण्यासाठी ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील कलाकार भेटले. याचे फोटो पूजा पुरंदरेने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.

अभिनेता अमेय बर्वे
अभिनेता अमेय बर्वे

हेही वाचा – Video: सिद्धार्थ शुक्लाच्या आईने दिवंगत लेकाचा ‘असा’ साजरा केला जन्मदिवस, सेलिब्रेशनमध्ये शहनाज गिलची अनुपस्थिती

दरम्यान, अमेय बर्वेची ‘सावली होईन सुखाची’ ही मालिका ‘सन मराठी’ वाहिनीवर १८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता ही मालिका पाहायला मिळणार आहे.

Story img Loader