काही महिन्यांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आता या मालिकेतील बरेच कलाकार नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या मालिकेतील एक प्रसिद्ध पात्र ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत झळकणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजपासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचं कथानक २५ वर्षांनी पुढील पाहायला मिळणार आहे. जयदीप-गौरीच्या प्रेमकहाणीचा नवा अध्याय सुरू होणार आहे. मालिकेत जयदीपचा अधिराज म्हणून पुनर्जन्म होणार आहे, तर गौरीचा नित्या म्हणून पुनर्जन्म पाहायला मिळणार आहे. यामुळे मालिकेत बरीच जुनी पात्र दिसणार नसून नव्या पात्रांची एन्ट्री होणार आहे. यामध्ये ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेतील एका कलाकाराचा समावेश आहे. तो म्हणजे अभिनेता अमेय बर्वे.

हेही वाचा – “इज्जत घालवली…”, विशाखा सुभेदारची ‘ती’ रील पाहून नेटकऱ्याची प्रतिक्रिया, अभिनेत्री उत्तर देत म्हणाली…

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील वैभव म्हणजे अमेय बर्वे आता ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत तो महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ही भूमिका काय असणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भातील पोस्ट ‘मराठी टेल बझ’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

हेही वाचा – “या भोळ्या चेहऱ्यामागचा सैतान…”, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईकची समीर परांजपेसाठी खास पोस्ट, म्हणाली, “माझं दुर्दैव…”

हेही वाचा – “अंतिम सामना वानखेडेलाच पाहिजे”, भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवानंतर ‘या’ मराठी कलाकारांचं मत

अभिनेत्री नंदिता पाटकर हिने ही पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करून लिहीलं आहे, “अमेय तुला पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत आहे. गिरीजा तुला खूप सारं प्रेम…हे खूप रोमांचक असणार आहे…”

हेही वाचा – लग्नानंतर अमृता देशमुखने नवरा प्रसादकडे ‘ही’ इच्छा केली व्यक्त, म्हणाली, “फक्त तू…”

दरम्यान, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत बरेच नवे कलाकार पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री हर्षदा खानविलकर या मालिकेत दिसणार आहेत. आतापर्यंत त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी आणि हटके असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sahkutumb sahparivar fame amey barve entry in sukh mhanje nakki kay asta pps
Show comments