‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘सहकुटुंब सहपरिवार’. या मालिकेने साडे तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील मोरे कुटुंबीयांनी प्रेक्षकांची अक्षरशः मनं जिंकून घेतली. अंजी, पशा, सूर्या, सुरू, वैभ्या, अवनी, ओंकार ही पात्र महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहेत. नवनवीन ट्विस्टमुळे या मालिकेने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं होतं. त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीमध्येही मालिका मागे नव्हती. मात्र कथानक पूर्ण झाल्यामुळे ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेने गेल्या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता याच मालिकेतील कलाकार नवनवीन भूमिकेत सध्या पाहायला मिळत आहे.

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अवनी म्हणजे अभिनेत्री साक्षी गांधी सध्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘नवी जन्मेन मी’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तिने संचिता ही भूमिका साकारली आहे. आज साक्षीने आईच्या वाढदिवसानिमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shruti Haasan With Parents
“लोक माझ्याकडे बोट दाखवायचे अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटित आई-वडिलांना म्हणाली ‘हट्टी’
Milind Gawali
“या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”
Aishwarya Narkar and Avinash Narkar Romantic Dance On Ajay Devgan Song Sathiya
“मुंबईत दोन दिवसांचे कपडे घेऊन आले होते अन्…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरेने ईशा पात्राच्या ऑडिशनचा सांगितला मजेशीर किस्सा
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
aai kuthe kay karte fame Radhika Deshpande expresses her point about women bindi on forehead
स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”
Leader of Opposition in Lok Sabha and Congress leader Rahul Gandhi.
Rahul Gandhi : राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात विदर्भापासून का केली?

हेही वाचा – ‘शुभविवाह’नंतर निळू फुलेंची मुलगी झळकली ‘या’ नव्या मालिकेत, पोस्ट करत म्हणाल्या, “छोटी पण छान भूमिका…”

साक्षी गांधीची पोस्ट वाचा…

आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा…
तुला कधीच थँक्यू म्हणता नाही आलं गं आणि मला असं वाटतं की आपल्या माणसाला का म्हणावं थँक्यू किंवा का मानावे आभार ? पण तसं नाहीये… एक थँक्यू तो बनता हे यार…आई हे थँक्यू आहे, तू आम्हाला चांगली शिकवण दिलीस त्यासाठी…
हे थँक्यू आहे, तू आमच्यावर चांगले संस्कार केलेस त्यासाठी…
हे थँक्यू आहे, तू आम्हाला धीटपणाने जगायला शिकवलं त्यासाठी…
हे थँक्यू आहे , तू आमच्यात आत्मविश्वास निर्माण केलास त्यासाठी…
हे थँक्यू आहे, प्रत्येक अडचणीत आम्हाला बाहेर काढलंस त्यासाठी …
हे थँक्यू आहे , तू मानाने जगायला शिकवलं त्यासाठी…लोकांशी माणुसकीने वागायला शिकवलं त्यासाठी…कुठल्याही परिस्थितीत संकटाशी दोन हात करायला शिकवलं त्यासाठी…बघितलंस संपतच नाहीये म्हणून म्हणत नव्हते… हाहा…आई आय लव्ह यू…तुझ्यातलं लहान बाळ असंच कायम राहू देत..जगभर फिर…स्वतःला वेळ दे… मनमोकळ हिंड…आणि माझं ऐकत जा जरा…मी तुझ्याशी भांडत राहणारच आहे…कारण तुझ्याशी भांडायला मला आवडतं अगं…आई मला तुझी खूप आठवण येतेय…मला लवकर भेटायला ये…

हेही वाचा – Video: लांबच्या प्रवासाचा कंटाळा आल्यावर अंशुमन विचारेचं कुटुंब काय करतं? तुम्हीच पाहा ‘हा’ व्हिडीओ

दरम्यान, साक्षीच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. साक्षीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.