‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेने साडे तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेचा गोड शेवट दाखवून संपवण्यात आली आहे. याचनिमित्ताने एका एंटरटेन्मेंट मीडियाबरोबर बोलत असताना अवनी म्हणजे अभिनेत्री साक्षी गांधीने वैभव म्हणजे अभिनेता निमिष कुलकर्णीला एक सल्ला दिला आहे.

३ जुलैला ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेचा शेवटचा आणि १०००वा एपिसोड प्रक्षेपित झाला. त्यामध्ये सावित्री बाईने मोरे कुटुंबियांना परत घर दिल्याचं दाखवलं. त्यानंतर पशा आणि अंजीला एक गोंडस बाळ झाल्याचं दाखवून मालिकेचा शेवट करण्यात आला. यानिमित्ताने साक्षी गांधी आणि निमिष कुलकर्णीने ‘कलाकृती मीडिया’ या एंटरटेन्मेंट युट्यूब चॅनलची बातचित केली.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबबरोबर अफेअरच्या चर्चा, निमिषने सोडलं मौन; म्हणाला, “आम्ही…”

यावेळी साक्षीला विचारलं गेलं की, ‘तू निमिषला कोणता सल्ला देशील.’ तेव्हा अभिनेत्री म्हणाली की, “मुळात तो माझा आधीपासून मित्र आहे. त्यामुळे मी काहीही बोलू शकते, कुठल्याही भाषेत बोलू शकते ते त्यालाही माहित आहे. माझं इतकंच म्हणणं आहे, तो उत्तम काम करतो. त्याच सगळं काही उत्तम आहे. त्याच जनरल नॉलेज खूप चांगलं आहे आणि मुळातच तो खूप हुशार आहे. तर आता त्याने स्वतःच्या शरीरावर काम करायला पाहिजे. आम्हाला तो धष्टपुष्ट दिसला पाहिजे. कारण त्याची पण स्वतःची खूप धावपळ होते. त्यामुळे मालिका संपली आहे, तर त्याला आता स्वतःकडे पाहायला वेळ मिळेल. त्यामुळे त्यानं हे सगळं करावं आणि त्यानं जर हे नाही केलं तर आम्ही त्याला सगळे पोकळ बांबूचे फटके देणार आहोत.”

हेही वाचा – ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत ‘या’ भूमिकेत दिसणार किरण माने; म्हणाले, “खूप वर्षांनी…”

हेही वाचा – “माझा दादा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होता अन्…” हेमांगी कवीने नितीन देसाईंच्या आठवणींना दिला उजाळा, म्हणाली, “असा निर्णय घेताना…”

दरम्यान ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेमध्ये साक्षी गांधी, निमिष कुलकर्णी व्यतिरिक्त सुनील बर्वे, नंदिता पाटकर, कोमल कुंभार, पूजा पुरंदरे, आकाश नलावडे, आकाश शिंदे, किशोरी अंबिका महत्त्वाच्या भूमिकेत होते.

Story img Loader