काही महिन्यांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही लोकप्रिय मालिका ऑफ एअर झाली. त्यामुळे या मालिकेतील अनेक कलाकार नवनवीन भूमिकेत सध्या पाहायला मिळत आहे. आज ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील वैभव उर्फ वैभ्या म्हणजेच अभिनेता अमेय बर्वेचा वाढदिवस आहे. सध्या अमेय हा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. अमेयच्या आज वाढदिवसानिमित्ताने कलाकार मंडळींसह चाहते त्याला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत आहेत. ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत अमेयची पत्नीची भूमिका साकारलेली अवनी म्हणजेच अभिनेत्री साक्षी गांधीने त्याला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री साक्षी गांधीने अमेयच्या वाढदिवसानिमित्ताने काही फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. पहिल्या फोटोमध्ये साक्षी आणि अमेयचा सेल्फी पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती अमेयचं औक्षण करताना दिसत आहे. हे दोन फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे, “तुझं ज्ञान, तुझी बुद्धी, तुझी हुशारी, तुझा स्मार्टनेस…यापलीकडे तुझी मस्ती, तुझे किस्से, तुझा कधीकधी डोकावणारा अल्लडपणा, तुझं उगीच रागावणं, तुझा Sarcasm हे सगळं असंच राहूदे …माणसाने आयुष्यात बदलावं स्वतःला असं म्हणतात…पण तू आहेस असाच राहा…आम्हाला तू असाच आवडतोस…माणसं जपत राहा…प्रेम करत राहा…”

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
Rahul Gandhi Criticized Mohan Bhagwat
Rahul Gandhi :”…तर मोहन भागवतांना अटक झाली असती”, राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…

हेही वाचा – प्रेमाची गोष्ट: देण्याघेण्यावरून पुन्हा गोखले-कोळी कुटुंबात वाद, नेमकं काय घडलं? पाहा

“तुझ्या कामाच्या आम्ही सगळे प्रेमात आहोतच…यापुढे सुद्धा तुला उत्तमोत्तम कामं मिळूदेत आणि ती कामं तू छान करशीलच… बाकी माझ्यावर सोड…मी तुला गॉसिप सांगत राहीनच… खूप सारं प्रेम मित्रा…(टिप: जमलं तर माझा अपमान कमी कर…आणि माझाशी जरा चांगलं वाग…नाहीतर बुक्कीत टेंगूळ..) हरी हरी…सीतापती सीताराम…”, असं साक्षीने लिहिलं आहे.

साक्षीच्या या पोस्टवर अमेयने प्रतिक्रिया देत तिचे आभार मानले आहेत. तसेच इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – Video: हर्षदा खानविलकर व संग्राम समेळची नवी मालिका लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस, पहिला प्रोमो आला समोर

दरम्यान, साक्षीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती सध्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘नवी जन्मेन मी…’ या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत साक्षीने संचिता ही भूमिका साकारली आहे.

Story img Loader