अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम सई लोकूर गरोदर आहे. तिने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत गरोदरपणाबद्दल माहिती दिली. सई व तिचा पती तीर्थदीप रॉय लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे पालक होणार आहेत. सईने गरोदरपणाचा अनुभव सांगितला आहे. स्वतःची काळजी घेत असून सुरुवातीचे काही दिवस काही दिवस थोडे आव्हानात्मक होते, असं तिने सांगितलं आहे.
सई ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना म्हणाला, “माझ्यासाठी सुरुवातीचे काही दिवस आव्हानात्मक होते, कारण मला थकवा जाणवत होता. मला अॅसिडिटीचा त्रास होत होता. पण तो काळही मी खूप एन्जॉय केला. माझ्या शरीरात एक जीव वाढत आहे. मला आठवतं की जेव्हा मला पहिल्यांदा उलटी झाली तेव्हा माझ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला होता आणि ती म्हणाली ‘सगळं ठीक आहे, तू लवकरच आई होणार आहेस’. त्यातूनच मला आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली. तीर्थदीप आणि मी सध्या वेगवेगळ्या भावनांमधून जात आहोत.”
कोणी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आवडली? सुबोध भावे म्हणाला…
“मी माझ्या जन्मगावी म्हणजेच बेळगाव, कर्नाटक इथे पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहोत. आम्ही स्वतःला सुजाण पालक बनण्यासाठी तयार करत आहोत. आम्हाला मुलगा होईल की मुलगी याचा फरक पडत नाही. खरं तर, आम्ही नुकतेच गोव्यात आमच्या बेबीमूनसाठी गेलो होतो. मी माझ्या मैत्रिणी शर्मिष्ठा राऊत आणि मेघा दाढे यांना याबाबत माहिती दिली, तेव्हा त्या खूप उत्साहित झाल्या होत्या. मी आईसोबत फुकेतला जाणार होते, त्यापूर्वी मेघा मला काही तास मुंबईत भेटली होती,” असंही सईने सांगितलं.
स्क्रीनवर कधी दिसणार, याबाबत सईला चाहते विचारत आहेत. “मी पडद्यावर कधी परतणार, याबद्दल लोक मला अनेकदा विचारतात. पण माझ्या लग्नानंतर मी माझ्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी ठरवून ब्रेक घेतला. मी ३५ वर्षांची होण्याआधी मला आई व्हायचं होतं, जेणेकरूण माझ्या बायोलॉजिक चक्रात अडथळा येणार नाही. योग्य वेळ आल्यावर मी पुन्हा अभिनयक्षेत्रात परतेन,” असं सई लोकूरने सांगितलं.