‘बिग बॉस मराठी’मुळे अभिनेत्री सई लोकूर घराघरांत लोकप्रिय झाली. वैयक्तिक आयुष्यात सईने २०२० मध्ये तीर्थदीप रॉयबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाच्या ३ वर्षांनंतर सईने डिसेंबर महिन्यात गोड मुलीला जन्म दिला. मनोरंजन विश्वापासून दूर असली तरी सई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती वैयक्तिक जीवनातील अनुभव देखील चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

सई लोकूरने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सईने गेल्या वर्षी १७ डिसेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला. अभिनेत्रीने तिच्या बाळाचं स्वागत बेळगाव येथे केलं. आता अभिनेत्री लग्नाला तीन वर्षे झाल्यावर सासरी राहायला गेली आहे. सई आणि तीर्थदीप यांनी गेल्यावर्षी १० जुलैला बंगळुरूमध्ये नवीन घर विकत घेतलं होतं. आता बंगळुरू येथे शिफ्ट होऊन अभिनेत्री एका नव्या प्रवासाला सुरूवात करणार आहे. “लग्नानंतर ३ वर्षांनी मी आता अखेर सासरी चालले…मी खूप उत्साही आहे..नवं शहर, नवीन घर, नवीन आयुष्य” असं कॅप्शन तिने पोस्टला दिलं आहे. आता सईने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या सासूबाईंनी तिचं कसं स्वागत केलं याची झलक पाहायला मिळत आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
bigg boss marathi season 5 fame yogita Chavan lavani dance video viral
Video: “मला लागली कुणाची उचकी…”, योगिता चव्हाणची ठसकेबाज लावणी; नेटकऱ्यांकडून होतंय भरभरून कौतुक, म्हणाले…
shocking video
अरे देवा! दुसऱ्याच्या घरातील फुलाची कुंडी चोरताना दिसली महिला, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कसे लोक आहेत..”
kareena kapoor shahid kapoor photos
करीना कपूर-शाहिद कपूर बऱ्याच वर्षांनी दिसले एकाच फोटोत; नेटकरी म्हणाले, “जेव्हा तुम्ही तुमच्या एक्सला…”
Sharayu Sonawane
Video : ‘पारू’ फेम अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; श्वेता खरात कमेंट करत म्हणाली…

हेही वाचा : ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनच्या साधेपणाने वेधलं लक्ष, पत्नीसह ५ स्टार हॉटेलमध्ये नाही तर जेवला ढाब्यावर, फोटो व्हायरल

अनेक दिवसांनी सासरी आलेल्या सूनेचं सासूबाईंनी मोठ्या प्रेमाने स्वागत केल्याचं यावेळी पाहायला मिळालं. सई लोकूरने यासंदर्भातील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. घरी बाळाला घेऊन आल्यावर सईच्या सासूबाईंनी सर्वप्रथम तिचं औक्षण केलं. याशिवाय संपूर्ण घरात अभिनेत्रीसाठी फुलांची सजावट करण्यात आली होती.

हेही वाचा : ‘बिग बॉस मराठी’ होस्ट करणार रितेश देशमुख! प्रोमो शेअर करत पत्नी जिनिलीयाने दोन शब्दांत दिली प्रतिक्रिया

सईने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सासू-सुनेचं खूपच सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळत आहे. “किती गोड”, “सुंदर घर”, “अभिनंदन डिअर” अशा कमेंट्स अभिनेत्रीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा : “महिला कलाकारांचे चुकीच्या पद्धतीने फोटो काढणं थांबवा”, मराठी अभिनेत्याची सूचक पोस्ट, पापाराझींबद्दल म्हणाला…

दरम्यान, सई लोकूरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तिने अनेक मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे. ‘बिग बॉस’मध्ये झळकल्यानंतर सई ‘सनम हॉटलाइन’ या वेब सीरिजमध्ये शेवटची पाहायला मिळाली होती. सध्या ती अभिनय क्षेत्रापासून दूर असून लेकीबरोबर एन्जॉय करत आहे.

Story img Loader