Sai Lokur Daughter : ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वामुळे अभिनेत्री सई लोकूर घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पहिल्याच सीझनमध्ये शोच्या अंतिम फेरीपर्यंत तिने बाजी मारली होती. कलाविश्वात यश मिळवल्यावर सईने वैयक्तिक आयुष्यात २०२० मध्ये तीर्थदीप रॉयबरोबर लग्नगाठ बांधली. लग्नाच्या ३ वर्षांनंतर म्हणजेच १७ डिसेंबर २०२३ रोजी सईने तिच्या बाळाचं स्वागत केलं.

सई लोकूरने तिच्या लाडक्या लेकीचं नाव ताशी असं ठेवलं आहे. ताशीबद्दल अनेक गोष्टी अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र, आजवर तिने लेकीचा चेहरा माध्यमांसमोर कधीच उघड केला नव्हता. आज स्वत:च्या वाढदिवसाचं औचित्य साधत सई लोकूरने आपल्या लेकीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. लेकीबरोबर सुंदर असा फोटो शेअर करत सईने खास पोस्ट देखील लिहिली आहे.

actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
shraddha aarya new born baby photo
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर
shivali parab mother emotional after seeing the look of Mangla movie
‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”
Govinda daughter Tina Ahuja opens up about failed Bollywood career
बाबा सुपरस्टार अन् लेकीचं एका चित्रपटानंतर करिअर संपलं; गोविंदाची मुलगी म्हणाली, “मला खूप वैताग…”

हेही वाचा : ‘बिग बॉस मराठी’ने लोकप्रिय मालिकांना काढलं मागे! ऑनलाइन TRP मध्ये मिळवलं ‘हे’ स्थान, पाहा संपूर्ण यादी…

लाडक्या लेकीसाठी सई लोकूरची पोस्ट

सई ( Sai Lokur ) लिहिते, “आज माझ्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी मला देवाने दिलेल्या सगळ्यात सुंदर गिफ्टचा फोटो मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. माझी प्रिय मुलगी ताशी. आज तिचा हा पहिलाच फोटो मी इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. माझी मुलगी माझ्यासाठी संपूर्ण जग आहे. तिच्यावरचं माझं प्रेम मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आई म्हणून हा माझा पहिला वाढदिवस आहे आणखी काहीच मी देवाकडे मागू शकत नाही. ताशी म्हणजे माझं जीवन आहे….मला मिळालेली सर्वात सुंदर भेट आहे. तुम्ही आम्हाला दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद! आणि सर्वांचे मनापासून आभार!”

हेही वाचा : दारूची नशा, सिगारेटचे चटके अन्…; नर्गिसने सुनील दत्त यांच्याशी लग्न केल्यावर राज कपूर यांची ‘अशी’ झाली होती अवस्था

सईने ( Sai Lokur ) शेअर केलेल्या फोटोमध्ये तिची लेक फारच गोड दिसत आहे. सुंदर असा फ्रॉक आणि डोक्यावर लाल रंगाचा हेअरबँड घालून ताशी आईच्या मांडीवर बसली आहे. कॅमेऱ्याकडे पाहून सईच्या लेकीने गोड स्माइल देत पोज दिली आहे. तर, अभिनेत्रीने या फोटोमध्ये फ्लोरल फ्रिंटचा ड्रेस घातल्याचं पाहायला मिळत आहे.

Sai Lokur
अभिनेत्री सई लोकूर ( Sai Lokur )

दरम्यान, नेटकऱ्यांनी सईला ( Sai Lokur ) वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्या लेकीची पहिली झलक पाहून अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader