मराठमोळी अभिनेत्री सई लोकूर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात सहभागी झाली होती. या कार्यक्रमामुळे अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली. २०२० मध्ये अभिनेत्रीने तीर्थदीप रॉयसह लग्न केलं. लवकरच सईच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने गरोदर असल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली होती.

सई लोकूरने बाळाचं स्वागत करण्यासाठी काही काळासाठी मनोरंजन विश्वातून ब्रेक घेतला आहे. अलीकडे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिने नुकताच बेबी बंपसह करीना कपूरचं लोकप्रिय गाणं “अंदेखी अंजानी…”वर डान्स केला.

What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”
Bigg Boss 18 Edin Rose Yamini Malhotra is evicted from salman khan show after digvijay rathee evicted
Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीनंतर आणखी दोन सदस्य घराबाहेर; कशिश कपूर ढसाढसा रडत म्हणाली, “इथे प्रत्येकजण साप…”
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Bajrang Sonwane On Beed Santosh Deshmukh Case
Bajrang Sonwane : संतोष देशमुख हत्याप्रकरणावर बोलताना बजरंग सोनवणे भावूक; म्हणाले, “काळजाला…”
Actor Subodh Bhave expressed his anger that Marathi movie are not getting screens
“आपल्याच राज्यात आपल्याला भीक मागवी लागतेय”, सुबोध भावे असं का म्हणाला? जाणून घ्या…

हेही वाचा : “पूर्ण कपड्यांमधील फोटो शेअर केला तरी…”, भूमी पेडणेकरने ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगबद्दल मांडलं स्पष्ट मत, म्हणाली…

“माझ्या लहान बाळाला भेटण्यासाठी मी खूपच आतुर आहे”, असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे. बिग बॉस विजेती मेघा धाडेने या व्हिडीओवर खास कमेंट करत लाडक्या मैत्रिणीला काळजी घे असं म्हटलं आहे. याशिवाय सईच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा : “गेल्या ७ वर्षांपासून…”, हार्दिक जोशीच्या वाढदिवसानिमित्त अक्षयाची खास पोस्ट, नेटकरी म्हणाले, “राणादा अन् पाठकबाई…”

एका युजरने सईच्या व्हिडीओवर, “अगं तुला हे शोभत नाही…यापेक्षा आराम कर, अतिउत्साही होऊ नकोस”, अशी कमेंट केली आहे. यावर उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “मला जे योग्य वाटतं ते मी नेहमीच करते. तुम्हाला आवडत नसेल तर बघू नका. माझ्या येणाऱ्या बाळाला मी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही? याचा मला काहीच फरक पडत नाही.”

हेही वाचा : ३० वर्षांपूर्वी बॉलीवूड सोडणाऱ्या अभिनेत्रीला करायचंय पुनरागमन; म्हणाली, “मी बिकिनी मॉम…”

sai lokur
सई लोकूर

दरम्यान, सई लोकूर आणि तीर्थदीप रॉय दोघेही लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. सईने आतापर्यंत ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘किस किसको प्यार करू’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात ती अंतिम फेरीत दाखल झाली होती.

Story img Loader