अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या अभिनयाबरोबर सुंदर फोटो, व्हिडीओमुळे नेहमी चर्चेत असते. सईच्या अभिनयाचा जितका चाहता वर्ग आहे तितकाच तिच्या सौंदर्याचा चाहता वर्ग तयार झाला आहे. तिचे फोटो, व्हिडीओ हे नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. सध्या सईच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यामध्ये सईने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील लाडक्या व्यक्तीचा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकार लंडन दौऱ्यावर गेले होते. ते आता परत आले आहेत. पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. २ डिसेंबरपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. याच निमित्ताने सई ताम्हणकरने हास्यजत्रेच्या सेटवरील सफर घडवली. तिने संपूर्ण हास्यजत्रेचं चित्रीकरण कसं चालतं? याविषयी सांगितलं. तसंच सईने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील लाडक्या व्यक्तीबद्दल खुलासा केला.

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री झळकणार नव्या चित्रपटात, पोस्ट करत म्हणाली, “तुमच्या आशीर्वादाची गरज…”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील सईची लाडकी व्यक्ती म्हणजे प्रसाद ओक आहे. ती प्रसादला ‘पश्याजी’ या नावाने हाक मारते. याविषयी तिने ‘सोनी मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

सई ताम्हणकर म्हणाली, “ही माझी साथी, सवंगडी पश्याजी. आमच्या दोघांमध्ये जर कोणी माइक लावला तर काय होईल याची गॅरंटी आम्ही नाही घेऊ शकतं आणि मला असं वाटतंय शेजारी बसण्यासाठी यापेक्षा चांगली व्यक्ती नसावी. आमची जोडी परफेक्ट आहे. इथे बसून आमच्या दोघांचीही साथ मला तितकीच आवडते. म्हणजे कधी कधी प्रसादच्या जागी सिद्धार्थ जाधव येतो, सोनाली कुलकर्णी येते, निर्मिती सावंत येतात पण मी बेधडकपणे बोलते मला पश्याजीची आठवण येते. आम्ही याच्याआधी मित्र होतो. पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाने आमचं नातं आणखी दृढ झालं. मला प्रसाद सारखा मित्र भेटला, यासाठी मी आनंदी आहे.”

हेही वाचा – Video: ‘फुलवंती’ आणि ‘चंद्रा’ आमनेसामने; ‘मदनमंजिरी’ गाण्यावर प्राजक्ता माळी-अमृता खानविलकरचा जबरदस्त डान्स

हेही वाचा – Video: सई ताम्हणकरने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ तिघांचं केलं कौतुक; एकाला म्हणाली, ‘सुपीक जमीन’, तर दुसऱ्याला…

दरम्यान, सई ताम्हणकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘अग्नि’ या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. ६ डिसेंबरला सईचा ‘अग्नि’ चित्रपट अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता प्रतिक गांधी, दिव्येंदु शर्मा, सैयामी खेर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. याशिवाय सई पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित ‘असंभव’ चित्रपटात दिसणार आहे. १ मे २०२५ रोजी सईचा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसंच याआधी सई ‘बोल बोल राणी’ या थ्रिलर चित्रपटात सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर यांच्याबरोबर पाहायला मिळणार आहे. तिचा हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhankar favorite person is prasad oak from maharashtrachi hasyajatra pps