मराठीतील छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. गेल्या सात वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहेत. महाराष्ट्रातच नाही तर जगभरात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा चाहता वर्ग आहे. त्यामुळे सातत्याने या कार्यक्रमाचे अमेरिका, लंडन दौरे होतं असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा लंडन दौरा झाला. या दौऱ्याला देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. याचे फोटो, व्हिडीओ कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आता लंडन दौऱ्यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं नवं पर्व सुरू होतं आहे. आजपासून या नव्या पर्वाला सुरुवात होतं आहे. त्यानिमित्ताने कार्यक्रमातील कलाकारांशी खास संवाद साधला आहे.

हेही वाचा – Video: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा खोट्या! लेकीच्या १३व्या बर्थडेची पार्टी केली होती एकत्र, व्हिडीओ आले समोर

नेहमीप्रमाणे या नव्या पर्वात परीक्षणाची जबाबदारी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता प्रसाद ओकवर आहे. अशातच सईने हास्यजत्रेच्या सेटवरील आवडत्या तीन गोष्टींचा खुलासा केला आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीच्या सोशल मीडियावर सईचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओमध्ये सुरुवातीला सईला विचारलं की, तू नेहमी कॅरी करतेस अशा तीन गोष्टी कोणत्या? सई म्हणाली, “फोन, लिप बाम आणि घराच्या चाव्या.” त्यानंतर सईला विचारलं की, हास्यजत्रेच्या सेटवरील आवडत्या तीन गोष्टी कोणत्या? तर अभिनेत्री म्हणाली, “शेंगदाणे, माझी खुर्ची आणि सगळं.”

हेही वाचा – Video: ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यावर श्रेया घोषाल आणि गणेश आचार्य यांचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: दुआ लिपाने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये शाहरुख खानच्या चाहत्यांना दिलं जबरदस्त सरप्राइज, सुहाना खान व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

दरम्यान, सई ताम्हणकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘अग्नि’ या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. ६ डिसेंबरला सईचा ‘अग्नि’ चित्रपट अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता प्रतिक गांधी, दिव्येंदु शर्मा, सैयामी खेर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. याशिवाय सई पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित ‘असंभव’ चित्रपटात दिसणार आहे. १ मे २०२५ रोजी सईचा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसंच याआधी सई ‘बोल बोल राणी’ या थ्रिलर चित्रपटात सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर यांच्याबरोबर पाहायला मिळणार आहे. तिचा हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sai tamhankar like these three things on set of maharashtrachi hasyajatra pps