प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. तिच्या ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट्स’, ‘प्यार वाली लव्हस्टोरी’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नुकतीच सईने अवधूत गुप्ते यांच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी सईच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे करण्यात आले तर काही प्रश्नांना अभिनेत्रीने बेधडक उत्तरे दिली. सध्या सईचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सई तिला कशाप्रकारची लहान मुलं आवडतात याबाबत सांगताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “तीन वर्ष ऑडिशन्स देऊन…”, बॉलीवूड अभिनेत्याला आठवले संघर्षाचे दिवस; म्हणाला, “बायकोचे दागिने, राहते घर…”

अवधूत गुप्तेंच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाला सध्या प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सईला शोच्या प्रोमोमध्ये अवधूत गुप्ते विचारतात, “लहान मुलं सर्वांनाच आवडतात पण, तुला लहान मुलांमध्ये सर्वात जास्त काय आवडते? तो विशेष गुण काय आहे याबाबत तूच आम्हाला सांग?” यानंतर अभिनेत्री लाजते. अवधूत गुप्ते पुढे म्हणतात, “बरं ठिके…तुला शेमडी लहान मुलं का आवडतात?” याबाबत आम्हाला सांग.

हेही वाचा : Video : “देव करो अन् सर्वांना…”, सई ताम्हणकर आणि प्रार्थना बेहरेने गायलं सोनालीसाठी खास गाणं, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

अवधूत गुप्तेंच्या प्रश्नाला उत्तर देत सई म्हणते, “अरे काय वाटेल लोकांना…सई ताम्हणकरला लहान मुलांच्या त्या वाईट सवयीबद्दल, शेंबूडबद्दल एवढी उत्सुकता आहे. लहान मुलांचे नाक एवढे छोटे असते की, त्यांच्या नाकातून पटकन शेंबूड काढायला मजा येते.” सईचे उत्तर ऐकून अवधूत गुप्ते म्हणतात, “म्हणजे एकंदर तुला शेमडी लहान पोरं आवडतात…” सईने दिलेले उत्तर ऐकून सर्वजण मोठ-मोठ्याने हसू लागतात.

हेही वाचा : “३१ डिसेंबरच्या रात्री खूप दारु प्यायलो अन्…”, प्रियदर्शन जाधवने सांगितली आयुष्यातील कटू आठवण; म्हणाला, “त्या नाटकातून…”

सई ताम्हणकर आणि अवधूत गुप्ते यांचा ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, अभिनेत्री सई ताम्हणकरला याव्यतिरिक्त अवधूत गुप्तेंनी अनेक प्रश्न विचारले. आवडता सहकलाकार म्हणून सईने अंकुश चौधरी आणि स्वप्नील जोशी यांचे नाव घेतले. तसेच इतर काही प्रश्नांचीही अभिनेत्रीने स्पष्ट उत्तरे दिली.