बिग बॉस हिंदीचा सोळावा सीजन पहिल्या दिवशी पासूनच चर्चेत आहे. या शोमध्ये दिग्दर्शक साजिद खान हा ही सहभागी झाला. साजिद खानच्या या शोमधल्या एन्ट्रीमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्याच्यावर असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे त्याला या कार्यक्रमातून बाहेर काढले जावे अशी मागणी सर्वत्र होत होती. पण अद्याप साजिद खान बिग बॉसच्या घरातच आहे. अशातच त्याने या कार्यक्रमाच्या निर्मात्यांशी एक करार केल्याचं समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साजिद खान खेळाव्यतिरिक्त त्याच्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देतानाच अधिक दिसतो. तो खेळात कमी दिसत असला तरी त्याच्या वक्तव्यांमुळे आणि घरात त्याने मांडलेल्या मुद्द्यांमुळे तो सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. त्याचं वागणं-बोलणं अनेकांना खटकतं. त्यामुळे साजिदला या कार्यक्रमातून बाहेरचा रस्ता दाखवावा अशी अनेकांची इच्छा आहे. मात्र आगामी काळात तसं काहीही होणार नसल्याचं चित्र दिसत आहे.

हेही वाचा : Video: पांढरा बाथरोब, डोक्यावर टॉवेल…दिशा पटानी आणि तिचा कथित बॉयफ्रेंड यांचा बाथरूममधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

आणखी वाचा : ‘बिग बॉस’मधून राखी सावंतचा पत्ता होणार कट? घरातली भांडी फोडल्याने अभिनेत्रीबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

एका मीडिया रिपोर्टनुसार साजिद खानने बिग बॉसमध्ये राहण्यासाठी या कार्यक्रमाच्या निर्मात्यांशी एक मोठा करार केला आहे. त्यानुसार साजिद आणखीन काही दिवस या घरातच असणार आहे. या करारानुसार २३ जानेवारीच्या आधी साजिद खान या घरातून बाहेर पडणार नाही. त्यामुळे स्वतःला वाचवण्यासाठी कराराच्या माध्यमातून साजिदने एक जबरदस्त शक्कलच लढवली आहे. पण अद्याप कोणीही या कराराबाबत अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.