‘हाऊसफुल’ आणि ‘हे बेबी’ यांसारख्या हिट विनोदी चित्रपटांची निर्मिती करणार दिग्दर्शक आणि निर्माता साजिद खानने आता बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. १ ऑक्टोबरला सलमान खान होस्ट करत असलेला रिअलिटी शो ‘बिग बॉस १६’ ची घोषणा झाली. या पर्वात साजिद खानने स्पर्धक म्हणून एंट्री घेतली आहे. यावेळी त्याने त्याच्या काही फ्लॉप चित्रपटांवर बोलताना त्यांची खिल्ली उडवली. तसेच हिट चित्रपट ‘हाऊसफुल’बद्दल बोलताना ‘मी टू’ चळवळीतील आरोपांवरही मौन सोडलं.

बिग बॉसच्या मंचावर सलमान खानशी बोलताना साजिद खान म्हणाला, “माझ्याकडे जास्त काही काम नव्हतं. मागच्या चार वर्षांपासून मी घरी बसून आहे. जेव्हा कलर्स टीव्हीकडून मला या शोसाठी विचारणा झाली त्यावेळी मला वाटलं की मी इथे यायला हवं. स्वतःबद्दल काहीतरी शिकायला हवं. मागच्या काही वर्षात मी काम मिळावं यासाठी खूप प्रयत्न केले आहेत.” याचवेळी साजिदने त्याच्या आयुष्यातील चढ-उतारांवरही भाष्यं केलं. तसेच बिग बॉसच्या घरात त्याला बरंच काही शिकता येईल अशी अशाही त्याने व्यक्त केली.

आणखी वाचा-“मी काय म्हातारा आहे…” किरण माने- त्रिशूल मराठे यांच्यात वादाची ठिणगी, वाचा नेमकं काय घडलं

सलमान खानने यावेळी साजिद खानला म्हणाला, “तू बॉलिवूडच्या ए-लिस्ट कलाकारांना घेऊन काम केलं आणि यशस्वी झाल्यावर तुला त्याचा थोडा गर्वही झाला होता.” त्यावर हे मान्य करत साजिद म्हणाला, “एक म्हण आहे की ‘अपयश माणसाला उद्धस्त करतं.’ माझ्याबाबतीत याच्या उलट घडलं. मी खूपच अभिमानी झालो. एकामागोमाग एक ३ हिट चित्रपट दिल्यानंतर मला वाटलं मी आता पडणार नाही. मी कोणताच चुकीचा चित्रपट तयार करू शकत नाही. पण देवाने मला माझी जागा दाखवली. माझा ‘हिम्मतवाला’ आणि ‘हमशक्ल’ दोन चित्रपट फ्लॉप झाले. ‘हमशक्ल’नंतर माझ्यावर स्वतःचंच तोंड लपवायची वेळ आली. मी कामासाठी अक्षरशः तळमळत होतो.”

आणखी वाचा-अमिताभ बच्चन फ्रेंच कट दाढी ठेवण्यामागचं कारण नेमकं काय?

दरम्यान २०१८ साली साजिद खानवर मीटू चळवळीच्या वेळी गंभीर आरोप करण्यात आले होती. मंदाना करीमी, सलोनी चोप्रा, रॅशेल व्हाइटसह अनेक मॉडेल आणि अभिनेत्रींनी त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केले होते. या आरोपांमुळे त्याच्यावर फिल्म असोसिएशनने बंदीही आणली. अर्थात त्याने नेहमीच या आरोपांचं खंडन केलं होतं. साजिद खान आणि वाद यांचं फार जुनं नातं आहे. बिग बॉसमध्ये एंट्री घेतल्यानंतर त्याच्यावर आणि पर्यायाने बिग बॉसच्या निर्मात्यांवर जोरदार टीका होताना दिसत आहे.

Story img Loader