लोकप्रिय संगीतकार, गीतकार, गायक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते सलील कुलकर्णी ( Saleel Kulkarni ) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असतात. एवढंच नव्हे तर चालू घडामोडींवर परखड मतं देखील मांडताना दिसतात. नुकताच त्यांनी मराठमोळा अमेरिकन क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकरसह ( Saurabh Netravalkar ) गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. दोघांचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याआधी सलील कुलकर्णी ( Saleel Kulkarni ) यांनी सौरभ नेत्रावळकरचं कौतुक केलं होतं. सौरभनं सलील यांच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘एकदा काय झालं’ या चित्रपटातील ‘रे क्षणा थांब ना’ हे गाणं गायलं होतं. सौरभच्या आवाजात हे गाणं ऐकून सलील कुलकर्णी भारावून गेले होते. त्यांनी सौरभचा व्हिडीओ शेअर करत लिहिलं होतं, “रे क्षणा थांब ना…गाताना क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकर.. ज्यानं टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला हरवण्यासाठी आणि यूएसए संघाला सामना जिंकून देण्यासाठी ती शानदार सुपर ओव्हर टाकली. हा व्हिडीओ पाहून खूप भारी वाटतंय…एक सॉफ्टवेअर इंजिनिअर..जो भारतासाठी अंडर-१९ विश्वचषक खेळला आणि आता तो यूएस क्रिकेट संघाचा महत्त्वाचा भाग आहे… हा प्रवास नक्कीच सोपा नसेल…( असं मी एका प्रोफेशनल क्रिकेटपटू मुलीचा बाबा म्हणून सांगू शकतो. ( P.S – सौरभ… भावा..भारताबरोबर १२ तारखेला खेळताना just take it easy .. बाकी एरवी मग तुला full support आहेच. )

हेही वाचा – Video: “मन्या बाबू…”, ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा मुलगा पुढील शिक्षणासाठी निघाला विदेशात, पोस्ट करत म्हणाले…

Saleel Kulkarni Post

सलील कुलकर्णी व सौरभ नेत्रावळकरचा पाहा व्हिडीओ

या कौतुकानंतर सलील यांनी आता थेट सौरभसह ‘रे क्षणा थांब ना’ गाणं गायलं आहे. याचा व्हिडीओ त्यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला असून लिहिलं आहे, “रे क्षणा थांब ना .. ( एकदा काय झालं ) सौरभ नेत्रावळकर आणि सलील कुलकर्णी…साधेपणा या सुपर टॅलेंटेड गोलंदाजाला आणखी खास बनवतो. सौरभ नेत्रावळकर तुझा खूप अभिमान वाटतो…असाच सर्वांना प्रेरणा देत राहा.”

हेही वाचा – यशस्वी मॉडेल, सुपरस्टार्ससह केलं काम, पण २५ चित्रपट झाले फ्लॉप; ‘या’ अभिनेत्याने फक्त अभिनय नव्हे तर देशही सोडला

दरम्यान, सलील कुलकर्णी ( Saleel Kulkarni ) व सौरभ नेत्रावळकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर काही तासांमध्ये व्हायरल झाला आहे. नेटकरी प्रतिक्रियेद्वारे दोघांचं कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saleel kulkarni along with american cricketer saurabh netravalkar sang the song re kshana pps