Saleel Kulkarni New Hotel : मराठी संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायक, संगीतकार, गीतकार सलील कुलकर्णी नेहमी चर्चेत असतात. आपल्या आवाजानं, कवितेनं सगळ्या वयोगटातील लोकांना भुरळ पाडणारे सलील कुलकर्णी यांनी दिग्दर्शन क्षेत्रात नशीब आजमावल्यानंतर उद्योग क्षेत्रात पदार्पण केलं. राष्ट्रीय पुरस्कार विजेते सलील कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यात स्वतःचं नवं हॉटेल सुरू केलं. ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिली होती. पण सलील कुलकर्णींच्या नव्या हॉटेलचं नाव ‘बँगलोर कॅन्टीन’ का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. याच प्रश्नाचं उत्तर सलील यांनी स्वतः दिलं आहे.

भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याच्या आनंदात सलील कुलकर्णींनी उद्योग क्षेत्रात पदार्पण करत असल्याचं जाहीर केलं होतं. या संदर्भात त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्याच्या काही दिवसांनंतर ६ जूनला सलील कुलकर्णी यांच्या ‘बँगलोर कॅन्टीन’ या नव्या हॉटेलचं उद्घाटन झालं. पुण्यातील सिंहगड रोडच्या खाऊगल्लीत सुरू केलेल्या या हॉटेलचं उद्घाटन सलील कुलकर्णींच्या ( Saleel Kulkarni ) आईच्या हस्ते झालं होतं. याचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं होतं, “लहानपणी आई आम्हाला डोसा खायला घेऊन जायची. काल आम्ही तिच्या हस्ते बँगलोर कॅन्टीनचं उद्घाटन केलं. नक्की भेट द्या सिंहगड रोड खाऊगल्ली येथील बँगलोर कॅन्टीनला.”

हेही वाचा – Video: सलील कुलकर्णींनी अमेरिकन क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकरसह गायलं ‘हे’ लोकप्रिय गाणं, पाहा व्हिडीओ

या पोस्टनंतर १२ जुलैला सलील कुलकर्णींनी ( Saleel Kulkarni ) हॉटेलचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर एका चाहत्याने हॉटेलच्या नावाविषयी प्रश्न विचारला. चाहत्याने प्रतिक्रिया देत विचारलं की, हे नाव ठेवण्यामागे काही विशेष कारण आहे का? यावर सलील कुलकर्णी म्हणाले की, “मेनू…अन्नाचे प्रकार आणि पाककृतीचे प्रकार यावरून हॉटेलचं नाव ठेवण्यात आलं आहे.”

Saleel Kulkarni

हेही वाचा – Video: “मन्या बाबू…”, ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा मुलगा पुढील शिक्षणासाठी निघाला विदेशात, पोस्ट करत म्हणाले…

दरम्यान, सलील कुलकर्णींच्या ( Saleel Kulkarni ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते संगीत क्षेत्रातील काम सांभाळत चित्रपटाचं देखील काम करत आहेत. ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर गेल्यावर्षी त्यांचा ‘एकदा काय झालं’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याच चित्रपटाला ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा मान मिळाला. आता सलील कुलकर्णींचा ( Saleel Kulkarni ) नवा चित्रपट कोणता असणार आहे? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.