राखी सावंतची आई जया यांचं शनिवारी संध्याकाळी निधन झालं. आपल्या अनेक दिवसांपासून त्या कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमरशी झुंजत होत्या. मात्र शनिवारी संध्याकाळी मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जया या राखी सावंत हिच्या भक्कम आधार होत्या. त्यांच्या निधनाने राखी खूप कोलमडून गेली आहे. आईच्या निधनानंतर राखी सावंतला मोठा धक्का बसला आहे. राखीच्या आईच्या निधनाची बातमी कळताच सलमान खाननेही तिला फोन केला होता असं राखीचा भाऊ राकेश याने सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बिग बॉस मराठी’तून बाहेर पडल्यानंतर राखीने तिच्या आईला ब्रेन ट्युमर झाल्याची माहिती दिली होती. त्यापूर्वी २०१५ मध्ये त्यांचं कॅन्सरचंही ऑपरेशन झालं होतं. तर २०२१ सालीही त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया पार पडली. त्यावेळी सलमान खान आणि सोहेल खान यांनी राखीला मदत केली होती. तसंच त्यानंतर देखील सलमान खान आईच्या उपचारांसाठी राखीच्या मदतीला उभा राहिला. आता राखीचा भाऊ राकेश याने त्याचे आभार मानले आहेत.

आणखी वाचा : काही वर्षांपूर्वी वडीलांचं निधन आणि आता आईचं…जाणून घ्या राखी सावंतच्या कुटुंबाविषयी

‘ईटाइम्स’शी केलेल्या संवादादरम्यान राकेश म्हणाला, “माझ्या आईला आजारपणामुळे खूप वेदना होत होत्या. कर्करोग मूत्रपिंड आणि फुफ्फुसांमध्ये पसरला होता, ज्यामुळे तिचे अनेक अवयव निकामी झाले होते. माझ्या आईलाही ब्रेन ट्यूमर झाला होता आणि त्यानंतर तिच्या मृत्यूच्या रात्री तिला हृदयविकाराचा झटका आला.”

हेही वाचा : वयाच्या ४४ व्या वर्षी राखी सावंत गरोदर? प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली…

पुढे तो म्हणाला, “आई गेल्यानंतर इंडस्ट्रीशी संबंधित सर्व लोकांनी आम्हाला फोन करून शोक व्यक्त केला. सलमान भाईही फोन करून राखीशी बोलले. आईच्या उपचारासाठी मदत करणारे सर्व लोक येथे पोहोचले होते. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो, विशेषतः सलमान सरांचे. त्यांच्यामुळे माझी आई आणखी तीन वर्षे जगली. त्यांनी माझ्या आईच्या ऑपरेशनचा सर्व खर्च उचलला आणि मागच्या वेळी त्यांनी आमच्या आईला जीवनदान दिले.”

राखीची आई जया यांनी शनिवारी जुहू येथील सिटीकेअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ब्रेन ट्यूमर आणि कॅन्सर यांसारख्या गंभीर आजारांशी त्या दीर्घकाळ झुंज देत होत्या. अखेर मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाले.