बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानने ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये एण्ट्री केली. साजिदचं ‘बिग बॉस’च्या घरामध्ये जाणं कलाक्षेत्रामधील काही अभिनेत्रींना अजिबात पटलेलं नाही. सतत त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करण्यात येत आहेत. दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरामध्ये आता त्याचा खरा चेहरा समोर येत असल्याचं प्रेक्षक म्हणत आहेत. प्रेक्षकांपाठोपाठ आता सलमान खाननेही साजिदवर नाराजी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा : “मी कधीही आई होऊ शकणार नाही, कारण…”; प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेझने व्यक्त केली खंत
नुकत्याच पार पडलेल्या ‘बिग बॉस १६’च्या ‘विकेंड का’ या एपिसोडमध्ये सलमान खान साजिद खानला आरसा दाखवला आहे. यादरम्यानचा एक प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात सलमान खानने साजिदवर राग व्यक्त करत त्याला खडे बोल सुनावले आहेत. तसेच सलमानने साजिद खानला ढोंगीही म्हटले.
या व्हायरल प्रोमोमध्ये सलमान खान म्हणतो, “साजिद, या घरात तू काय करतोय?” यावर उत्तर देताना साजिद म्हणतो की, “मी येत्या दिवसात मी माझी पानं दाखवेन.” साजिद खानचे हे उत्तर ऐकून सलमान खान चांगलाच संतापताना यात दिसला. सलमान म्हणतो, “इथे स्वतःची पानं दाखवण्यासाठी वेळ मिळत नाही. तुम्हीच तुम्हाला बाहेर काढण्यासाठी देत कारणं देत आहात. तुम्हाला माझं म्हणणं लक्षात येत आहे की नाही? तुम्ही ढोंगी आहात. तुम्ही एक निर्णय घेता आणि नंतर तो बदलता. याला म्हणतात डबल स्टॅंडर्ड.”
हेही वाचा : “प्रत्येकाला एक…” करणवीर बोहरा आणि पूनम पांडेचा साजिद खानला पाठिंबा
दिग्दर्शक साजिद खानवर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. FWICE संस्थेने साजिद खानवर बंदी घातली. ‘हिम्मतवाला’ ‘हमशकल्स’ सारखे अपयश दिल्यानंतर, साजिद खान ‘हाऊसफुल ४’मधून पुनरागमन करणार होता. तथापि, अशा आरोपांमुळे साजिदला या चित्रपटातून पायउतार होण्यास सांगण्यात आले आणि साजिद-फरहाद या दिग्दर्शक जोडीने चित्रपटाचा ताबा घेतला.