२०२२ हे वर्ष अनेक सेलिब्रेटी कपल्ससाठी खूप खास ठरलं. यावर्षी अनेक सेलिब्रिटी विवाह बंधनात अडकले तर अनेकांच्या घरी पाळणा हलला. प्रियांका चोप्रा-निक जोनस, सोनम कपूर-आनंद अहुजा भारती सिंग-हर्ष लिंबाचिया, बिपाशा बासू-करण सिंह ग्रोवर, आलिया भट्ट-रणबीर कपूर ही जोडपी आई-बाबा झाली. अशातच आता बॉलिवूड अभिनेता वरुण धवनही लवकरच बाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खुद्द सलमान खानने आता याचा ईशारा दिला आहे.
अभिनेता वरुण धवन आणि क्रिती सेनॉन गेले अनेक दिवस त्यांच्या ‘भेडिया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्या दोघांचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. त्याचा आगामी ‘भेडिया’ चित्रपट ट्रेलरवरून तरी अॅक्शन आणि कॉमेडी वाटत आहे. या चित्रपटाचे रिलीज आता काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. अशातच सध्या वरुण धवन आणि क्रिती सेनॉन या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने या दोघांनी नुकतीच ‘बिग बॉस’च्या मंचावर हजेरी लावली. त्यावेळी सलमानने वरुणकडे इशारा करत तो लवकरच बाबा होणार असल्याचे संकेत प्रेक्षकांना दिले.
हेही वाचा : ‘या’ गोष्टीची अजय देवगणला सर्वात जास्त भीती; तब्बूने दिलेल्या उत्तराने वेधलं लक्ष
‘बिग बॉस’च्या मंचावर गेल्यावर वरुण आणि क्रितीने सलमान खानबरोबर भरपूर मजा मस्ती केली. या शोमध्ये त्यांनी गेमही खेळला. या वेळेचा एक प्रोमो नुकताच आउट झाला आहे. याप्रमाणे सलमान वरुण आणि क्रिती सलमानचे चित्रपट आणि चित्रपटातील गाणी यांच्यावर आधारित एक खेळ खेळताना दिसत आहेत. या खेळदरम्यान दोघांच्याही डोळ्यावर पट्टी बांधुन सलमान त्यांना चित्रपटाशी निगडित वस्तू देतो आणि त्यावरून त्यांना चित्रपट किंवा गाणी ओळखायला लावतो. ओळखल्यानंतर दोघेही चित्रपट आणि गाण्यांची नावं सांगातात.
खेळ संपल्यानंतर, सलमान खान वरुण धवनला एक खेळणं देतो. सलमानने ते खेळणं वरुणला दिल्यावर तो गोंधळून जातो आणि म्हणतो, “मी याच काय करू ? आमच्या घरी लहान मूलही नाहीये.” त्यावर सलमान खान म्हणतो, “खेळणं आलंय, मूलही लवकरच येईल.” सलमानच्या या उत्तरावर वरुण लाजलेला दिसला. सलमान खानच्या या इशाऱ्यावरून वरुण आणि नताशा लवकरच आई-बाबा होणार असल्याचं दिसतंय. पण अजून तरी वरुणने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
हेही वाचा : वरुण धवनने व्यक्त केली दक्षिणात्य चित्रपटांत काम करण्याची इच्छा; म्हणाला, “बॉलिवूडमध्ये आता…”
वरूण आणि नताशाने २४ जानेवारी २०२२ रोजी अलिबागमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केलं. यापूर्वी २ वेळा नताशा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र नताशाने त्या सर्व अफवा असल्याचे सांगत त्या चर्चांना पूर्णवीराम दिला होता. त्यामुळे आता सलमान जे म्हणाला ते खरं आहे का, हे जाणून घेण्यासाठी वरुणचे चाहते आतुर झाले आहेत.