Bigg Boss 18 : टेलिव्हिजनवरील वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस हिंदी’ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘बिग बॉस ओटीटी’चं तिसरं पर्व संपल्यापासून सगळ्यांचं लक्ष ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाकडे आहे. यादरम्यान सलमान खान हे पर्व होस्ट करणार नसल्याचं म्हटलं जात होतं. पण काही दिवसांपूर्वी सलमान खान ‘बिग बॉसच्या १८’व्या पर्वाचं चित्रीकरण करताना पाहायला मिळाला. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या चाहत्यांना दिलासा मिळाला. अशातच आता ‘बिग बॉस’ कधी आणि केव्हापासून सुरू होणार आहे? याचा खुलासा झाला आहे.
‘बिग बॉस’च्या १८व्या ( Bigg Boss 18 ) पर्वाचा दमदार प्रोमो नुकताच समोर आला आहे. ‘कलर्स टीव्ही’च्या सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये सलमान खान यंदाच्या पर्वात काय विशेष असणार हे सांगताना दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे या पर्वात सदस्यांचं भविष्य ‘बिग बॉस’ पाहणार आहेत.
हेही वाचा – “त्याचा पतंगाची दोरी…”, अरबाज पटेलच्या एलिमिनेशनवर मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट, म्हणाला…
सलमान खानचा हा प्रोमो शेअर करत ‘कलर्स टीव्ही’ने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “इस बार घर में भूचाल आएगा, क्योंकि बिग बॉस में टाइम का तांडव आएगा.” या कॅप्शनवरून यंदाच्या ‘बिग बॉस हिंदी’मध्ये काय थीम असणार आहे? हे स्पष्ट झालं आहे. टाइम का तांडव हे ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचं ( Bigg Boss 18 ) थीम असणार आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या आधारे घरातील स्पर्धकांना विभागले जाणार आहेत. गेल्या पर्वात कपल सामील झाले होते. पण यंदाच्या पर्वात सिंगल स्पर्धकच सहभागी होणार आहेत.
‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा ग्रँड फिनाले ६ ऑक्टोबरला पार पडणार आहे. रात्री ९ वाजता कलर्स आणि जिओ सिनेमावर हा बहुचर्चित ‘बिग बॉस’ पाहता येणार आहे. त्यामुळे आता चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – Video: वर्षा उसगांवकरांना कोथिंबीर वडी ओळखू येईना अन् मग…; पाहा नेमकं काय घडलं?
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात ( Bigg Boss 18 ) सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावांची सध्या चर्चा सुरू आहे. अद्याप निश्चित झालेल्या स्पर्धकांची नावं समोर आलेली नाही. पण अभिनेत्री शांती प्रिया, शैली साळुंके, शिल्पा शिरोडकर, निया शर्मा, धीरज धूपर, शोएब इब्राहिम, शहजादा धामी, चाहत पांडे, करणवीर मेहरा या कलाकरांना ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वासाठी विचारणा केल्याचं म्हटलं जात आहे.