सध्या टेलिव्हिजन विश्वामध्ये ‘बिग बॉस हिंदी’च्या नव्या पर्वाची चर्चा आहे. काही आठवड्यांपूर्वी सुरु झालेल्या कार्यक्रमाचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. या घरात रोजच काही ना काही घडामोडी घडत असतात आणि आठवड्याच्या शेवटी सलमान खान या घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसतो. परंतु हा सिझन सुरु झाल्यावर काही दिवसातच सलमानला डेंग्यू झाला. त्यामुळे त्याच्या जागी ‘बिग बॉस’च्या सूत्रसंचालनाची धुरा करण जोहरने सांभाळली. पण आता सलमान या शोच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत परतला असून त्याने अब्दु रोजिकच्या नॉमिनेट होण्याबद्दल मोठे विधान केले आहे.

आणखी वाचा : एका एपिसोडसाठी लाखाच्या घरात मानधन आकारणाऱ्या ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने केला रिक्षा प्रवास

Colors Marathi Bigg Boss Marathi season 5 will be re-broadcasted
Bigg Boss Marathi 5: पुन्हा एकदा तोच राडा अन् ‘भाऊचा धक्का’ पाहायला मिळणार; तारीख, वेळ जाणून घ्या…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shilpa Shirodkar
शिल्पा शिरोडकर ‘बिग बॉस १८’मध्ये गेल्यावर महेश बाबूने पाठिंबा का दिला नाही? अभिनेत्री म्हणाली, “त्यांना गर्विष्ठ…”
Bigg Boss 18 Fame Rajat Dalal talk about chahat pandey and controversy
Video: चाहत पांडेचं नाव ऐकताच रजत दलालने जोडले हात, विनंती करत म्हणाला…
mohammed siraj mahira sharma
क्रिकेटपटू मोहम्मद सिराज Bigg Boss फेम अभिनेत्रीला करतोय डेट? तिच्या आईने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझी मुलगी सेलिब्रिटी…”
Bigg Boss 18 Chum Darang Talking In Marathi Language Video Viral
Bigg Boss 18: “खूप छान…”, चुम दरांगने मराठीत साधला संवाद, विवियन डिसेनाच्या सक्सेस पार्टीबद्दल म्हणाली…
Bigg Boss 18 Winner Karan Veer Mehra talk about on Rajat Dalal Viral Reaction after Bigg Boss 18 Winner Announcement
Video: “जलने दो…”, रजत दलालच्या ‘त्या’ कृतीवर करणवीर मेहराची प्रतिक्रिया, शाहरुख खानची पोज देत म्हणाला…
saif ali khan home lit up like diwali
घराला आकर्षक रोषणाई, बहिणीची खास पोस्ट अन्…; जीवघेण्या हल्ल्यानंतर सैफ अली खान परतला, Video आला समोर

‘बिग बॉस’ या शोच्या प्रत्येक भागाची चाहते आतुरतेने वाट पाहतात. या घरात रोज काही ना काही घडत असते. या पर्वात अब्दू रोजिकने प्रेक्षकांच्या मने जिंकली आहेत. अब्दू रोजिकमुळे हा कार्यक्रम जास्त लोक पाहत आहेत. अब्दू रोजिकचे विनोद, त्याचा निरागसपणा, त्याच्या प्रत्येक स्टाईलने चाहत्यांना वेड लावले आहे. परंतु या आठवड्यात काही स्पर्धकांनी अब्दूला नॉमिनेट केले. त्यामुळे अब्दु या घरातून बाहेर जाणार की काय अशी चिंता प्रेक्षकांना लागली होती. या प्रकाराबद्दल सलमान खान ने भाष्य केले आहे.

अब्दू रोजिकला नॉमिनेट केल्यानंतर सलमान खानचा राग उफाळून आला. या शोमध्ये सलमान खान अब्दू रोजिकबद्दल बोलताना म्हणाला, “अब्दु हा ‘बिग बॉस १६’ चा सर्वोत्कृष्ट स्पर्धक आहे. मला अब्दूचा अभिमान आहे. अब्दू हा शोचा एकमेव स्पर्धक आहे जो न भांडता, न वादग्रस्त बोलता, न कोणाला त्रास देता राहतो. पण तरीही त्याला इतर सदस्यांनी नॉमिनेट केले. पण आता अब्दू घर सोडून जात आहे.” सलमान खानचे हे बोलणे ऐकून निमृत कौर अहलुवालिया रडायला लागली.

हेही वाचा : Bigg boss 16: अब्दू रोजिकची भारतातली पहिली दिवाळी ठरली खास, ‘बिग बॉस’च्या घरी मिळाले मोठे सप्राईज

अब्दु रोजिक हा ‘बिग बॉस १६’ मधील सर्वोत्तम स्पर्धक आहे आणि त्याला देशभरातून खूप प्रेम मिळत आहे. त्यामुळे अब्दुला बाहेर काढल्यावर इतर स्पर्धकांचा जिंकण्याचा मार्ग मोकळा होईल म्हणून काहींनी त्याला नॉमिनेट केले होते. पण दुसरीकडे, जर अब्दू रोजिक शोमधून बाहेर पडला तर तो शो आणि त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का असेल.

Story img Loader