Salman Khan Bigg Boss 18: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्धिकी यांचा १२ ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून खून करण्यात आला. बाबा सिद्दिकी यांच्या खुनाची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. त्यांच्या खुनानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. अभिनेता सलमान खान व सिद्दिकी खूप जवळचे मित्र होते. सिद्दिकी यांच्या खुनाची जबाबदारी घेतल्यावर बिश्नोई गँग सलमानला सातत्याने धमक्या देत आहे. यामुळे संपूर्ण खान कुटुंब तणावात आहे. या परिस्थितीतही सलमानने बिग बॉस १८ चे शूटिंग केले.

बिग बॉस १८ च्या या आठवड्यातील ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने स्पर्धकांचा समाचार घेतला. स्वतःच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत, मात्र त्यातच त्याला स्पर्धकांच्या क्षुल्लक भांडणांवर बोलावं लागतंय, असं सलमान म्हणाला. बाबा सिद्दिकींच्या खुनानंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशातच त्याने नॅशनल टीव्हीवर केलेल्या वक्तव्याची खूप चर्चा होत. त्याने त्याला मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केलं, असं म्हटलं जातंय.

rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा – सतत मिळणाऱ्या धमक्यांदरम्यान मनातलं बोलला सलमान खान? म्हणाला, “मला बिग बॉसच्या सेटवर…”

सलमान खान काय म्हणाला?

“यार, कसम खुदा की, माझ्या आयुष्यात मी सध्या कोणत्या गोष्टींमधून जातोय आणि मला इथे येऊन या सगळ्या गोष्टी हाताळाव्या लागत आहेत,” असं सलमान शनिवारी ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये चिडून म्हणाला. ‘वीकेंड का वार’मध्येच तो शिल्पा शिरोडकला शूटिंगसाठी यायचं नव्हतं असं म्हणाला होता. ”मला आज इथे यावंच वाटत नव्हतं, पण ही एक कमिटमेंट आहे, त्यामुळे मी आज इथे आहे,” असं सलमानने म्हटलं होतं.

सलमान खानचा व्हिडीओ

हेही वाचा – बाबा सिद्दीकी यांनी मिटवला होता सलमान खान व शाहरुख खान यांच्यातील अनेक वर्षांचा वाद, नेमकं काय घडलं होतं?

हा संपूर्ण एपिसोड सलमान गंभीर होता. स्पर्धकांनी आठवडाभर जे बिग बॉसच्या घरात केलं, त्यावर सलमानने गंभीर प्रतिक्रिया दिल्या. तसेच या एपिसोडमध्ये स्पर्धक चाहत पांडेने सलमानला लग्नासाठी प्रपोज केलं. त्यामुळे वातावरण थोडं हलकं झाले. यावेळी चाहतने तिला जोडीदारात कोणते गुण हवे ते सांगितलं आणि स्पर्धक करणवीर मेहराचं कौतुक केलं. मग सलमान खानला म्हणाली “सर, तुम्ही माझ्याशी लग्न कराल का?” यावर सलमान हसला आणि चाहतला म्हणाला, “तू जे गुण सांगितलेत, त्यापैकी एकही गुण माझ्याकडे नाही. तसेच माझं तुझ्या आईबरोबर अजिबात जमणार नाही.”

हेही वाचा – ‘झापूक झुपूक’ सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “भावाने मार्केट जाम केलंय”

सलमान खान १८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता सलमानने बिग बॉस १८ साठी शूटिंग केलं. त्याने या एपिसोडचे शूटिंग केले, तेव्हा त्याच्या सुरक्षेसाठी बिग बॉसच्या सेटवर ६० हून जास्त सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. ओळखपत्र तपासल्याशिवाय सेटवर येण्यास कुणालाही परवानगी नव्हती.

Story img Loader