काल ‘बिग बॉस १६’चा ग्रँड फिनाले संपन्न झाला. यात प्रियांका शहर चौधरी, एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे हे टॉप तीन स्पर्धक ठरले. या तिघांमधून बाजी मारत एमसी स्टॅन बिग बॉस 16 चा विजेता ठरला. पण सलमान खानसाठी ‘बिग बॉस १६’ चा विजेता एमसी स्टॅन नसून प्रियांका आहे असं तो म्हणाला.
‘बिग बॉस १६’मध्ये प्रियांका चहर चौधरी सुरुवातीपासूनच चर्चेत होती. तिच्या खेळाने आणि त्या घरातील तिच्या वागणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. तर प्रेक्षकांच्या मतानुसार देखील ती पहिल्या क्रमांकावर होती. परंतु ग्रँड फिनाले दरम्यान ‘बिग बॉस १६’ तील तिचा प्रवास संपला आणि तिला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. तिने प्रेक्षकांप्रमाणेच सलमान खानचे देखील मन जिंकून घेतलं. त्यामुळे सलमानसाठी स्टॅन नाही तर प्रियांकाच विजेती आहे असं तो म्हणाला.
ग्रँड फिनाले दरम्यान प्रियांका बाहेर पडली. यावेळी सलमानने तिच्या जिद्दीचा खूप कौतुक केलं. तो म्हणाला, “दरवेळी १५-१६ लोकांमध्ये आपलं स्थान निर्माण करणं सोपं नाही. तर अनेक गोष्टी घडल्यानंतरही ही मुलगी हसऱ्या चेहऱ्याने घरातून बाहेर पडली आहे. त्यामुळे माझ्यासाठी बिग बॉस १६ ची विजेती प्रियांकाच आहे.” आता सलमान खानचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. प्रियांकाच्या चाहत्यांनी देखील तिचं कौतुक करत त्यांच्या नजरेत प्रियांकाच विजेती असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा : ‘बिग बॉस १६’ शिव ठाकरेसाठी ठरलं खास! आता झळकणार सलमान खानच्या चित्रपटात?
दरम्यान बिग बॉस १६ चा विजेता एम सी स्टॅन झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बिग बॉस १६ च्या ट्रॉफीसाठी शिव ठाकरे अधिक पात्र असल्याचं अनेक जण म्हणत आहेत. त्याचप्रमाणे आता बिग बॉस बघणं आम्ही बंद करणार आहे, अशाही अनेक प्रतिक्रिया येत आहेत. स्टॅन विजेता झाल्याने प्रेक्षक निराश झाले आहेत.