Bigg Boss 17 Grand Finale : ‘बिग बॉस १७’ च्या ग्रँड फिनालेमध्ये सर्वात आधी कृष्णा अभिषेक आणि भारती सिंग यांनी घरातील स्पर्धकांचं मनोरंजन केलं. यानंतर, स्पर्धकांनी शोमध्ये त्यांचे शानदार परफॉर्मन्स केले. यानंतर, ग्रँड फिनालेमधून अरुण माशेट्टी आऊट झाला. त्यानंतर बोलताना सलमान खानने अंकिता लोखंडेबाबत एक मोठा खुलासा केला की तिने चार वेळा लग्न केलं आहे. अंकितानेही हे मान्य केलं आहे.
सलमान खान अंकिता लोखंडेला सात वचनं सासूला द्यायला सांगतो. यावेळी सलमानने खुलासा केला की अंकिताने चाल वेळा लग्न केलं आहे. अंकितानेही हे मान्य केलं. त्यानंतर सलमान खान म्हणाला की अंकिताने विकीशी चार वेळा लग्न केलं आहे आणि पाचव्यांदा करणार नाही नाही. यावेळी सलमान खानने अंकिता व तिच्या सासूकडून एकमेकींना सात वचनं द्यायला लावली.
यावेळी अंकिता लोखंडेने तिच्या सासूला वचन दिलं की ती तिच्या पतीला नेहमी आनंदी ठेवेल. त्याच्यावर प्रेम करेल. ती व विकी कधीच भांडणार नाही. यादरम्यान सलमान खान जैन कुटुंबासोबत मस्करी करताना दिसला. यावेळी विकी जैनच्या आईने अंकिताला म्हटलं की, त्यांच्या घरात मुलींचा नेहमीच सन्मान केला जातो. तिलाही तेवढाच आदर दिला जाईल.
अंकिता सासूबद्दल म्हणते, “माझी आई माझ्यावर नेहमीच प्रेम करते. ती खूप काळजी घेते.” यावर तिची सासू म्हणाली, “अंकिता, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करू.” यानंतर सलमान खान म्हणतो की अंकिताच्या सासूने मुलगा व सूनेला गूडन्यूज देण्यास सांगितलं आहे.
Bigg Boss 17 च्या महाअंतिम सोहळ्याकडे ‘या’ दोन स्पर्धकांनी फिरवली पाठ, कोण आहे ते?
दरम्यान, या शोमध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात खूप वाद झाल्याचं पाहायला मिळालं. अंकिताच्या सासूने तिच्याबद्दल बरीच विधानं केली होती. तिच्या व विकीच्या लग्नाला पाठिंबा नव्हता, तिच्यावर खूप खर्च करावा लागतो, असं म्हटलं होतं. त्यानंतर तिच्या सासूला चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. विकी आणि अंकिता यांच्यात इतका वाद झाला होता की अभिनेत्रीने घटस्फोटाची मागणीही केली. मात्र, नंतर दोघांचं भांडण मिटलं होतं.