वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस’चं सध्या ओटीटी पर्व जोरदार सुरू आहे. ओटीटीचं हे दुसरं पर्व प्रक्षेकांच्या चांगलंच पसंतीस उतरलं आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली लोकप्रियता पाहून हे पर्व आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवण्यात आलं आहे. पण, दुसऱ्या बाजूला बिग बॉस ओटीटीमधून अभिनेता सलमान खानच गायब झाला आहे. त्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. भाईजान बिग बॉस ओटीटीसह येणाऱ्या कुठल्याही पर्वाचं सूत्रसंचालन करणार नसल्याचा दावा केला जातं आहे. यामागचं कारण सिगारेट प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे.

गेल्या आठवड्यातील वीकेंडच्या वारमध्ये सलमान खानच्या हातात प्रेक्षकांनी सिगारेट पाहिली होती. त्यानंतर त्याचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आणि यामुळे तो ट्रोलिंगच्या जाळ्यात अडकला होता. काही लोकांनी भाईजानला पाठिंबा देत सिगारेट ओढण्यास काय चुकीचे आहे असं म्हटलं होतं.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
chota pudhari aka ghanshyam darode bought new place from bb money
छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…
Siddharth Statement on crowd of 'Pushpa 2'
‘पुष्पा २’च्या ट्रेलर लाँचवेळी पाटण्यात जमलेल्या गर्दीवर सिद्धार्थचं वक्तव्य; म्हणाला, “जेसीबीचं काम सुरू असताना…”
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

हेही वाचा – तमन्ना भाटियाच्या ट्रेंडिंग गाण्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा डान्स; नेटकरी म्हणाले, “अजय देवगण व सनी देओल…”

पण ‘बॉलीवूड लाईफ’च्या वृत्तानुसार, याच सिगारेट प्रकरणामुळे सलमानने बिग बॉस ओटीटीचं सूत्रसंचालन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय येणाऱ्या टेलिव्हिजनवरील बिग बॉसच्या १७व्या पर्वाचेही सलमान सूत्रसंचालन करणार नसल्याचाही दावा केला आहे. मात्र, याबाबत सलमान किंवा बिग बॉसच्या टीमनं अधिकृत भाष्य केलेलं नाही.

हेही वाचा – ‘मुन्ना भाई ३’ चित्रपटासाठी भेटले संजय दत्त व अर्शद वारसी? जाणून घ्या नेमकं कारण

हेही वाचा – काजोलची छोट्या पडद्यावर एंट्री; ‘या’ लोकप्रिय मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीस

दरम्यान, १६ व १७ जुलैच्या झालेल्या वीकेंड वारमध्ये सलमानऐवजी कॉमेडिअन कृष्णा अभिषेक व भारती सिंह सूत्रसंचालन करताना दिसले होते. ज्या प्रकारे सलमान घरातील सदस्यांची खरडपट्टी काढतो किंवा त्यांना खेळण्याचे सल्ले देत असतो, ते भारती व कृष्णा एकत्र मिळूनही करू शकले नाहीत. पण, आता येणाऱ्या काळात खरंच सलमानने बिग बॉसचे सूत्रसंचालन सोडलं की नाही हे स्पष्ट होईल.

Story img Loader