Bigg Boss 18 : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर अभिनेता सलमान खानला धमकी देण्यात आली. बाबा सिद्दीकीच्या हत्येच्या ६ दिवसांनंतर सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली गेली. लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील एका व्यक्तीने धमकीचा मेसेज केला असल्याचं म्हटलं जात आहे. अशा परिस्थितदेखील भाईजानने आपली प्रोफेशनल कमिटमेंट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. सलमान खान ‘बिग बॉस १८’च्या ‘वीकेंड वार’च्या शूटिंगला तयार झाला आहे.
लॉरेंस बिश्नोईकडून धमकी आल्यानंतर सलमान खानची सुरक्षा तगडी करण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून सलमान खान ‘बिग बॉस १८’चं ‘वीकेंड वार’ शूट नाही करणार अशी चर्चा सुरू होती. पण, आता सलमान खान ‘वीकेंड वार’च्या शूटिंगसाठी सेटवर पोहोचला आहे.
तगड्या सुरक्षेसह सलमान खान ‘वीकेंड वार’चं शूट करत असल्याचं म्हटलं जात आहे. ‘आजतक’च्या वृत्तानुसार, सलमान गेल्या रात्री तगड्या सुरेक्षसह सेटवर गेला होता. सेटवर कंपाउंड बनवलं गेलं असून तिथेच त्याला राहायचं आहे. सिंकदरच्या टीमने प्रोडक्शन आणि चॅनेलबरोबर बातचित केली आहे. जेणेकरून सर्व काही सुरळीत सुरू राहिलं.
एवढंच नव्हे तर सलमान खानबरोबर वैयक्तिक सुरक्षेसह वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे भाईजानच्या आजूबाजूला ६०हून अधिक सुरक्षा रक्षक तैनात असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच सलमान खानसाठी बनवण्यात आलेल्या कपाउंडमध्ये बाहेरच्यांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
हेही वाचा – “बिग बॉस मराठीला तू कलंक होतास”, घनःश्याम दरवडेचा ‘तो’ व्हिडीओ पाहून अभिनेत्रीची प्रतिक्रिया; म्हणाली…
दरम्यान, सलमान खान ‘वीकेंड वार’चं शूट करत असल्याचं समजताच चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्याचं कौतुक केलं जात आहेत. पण, ‘वीकेंड वार’ला सलमान कोणत्या सदस्याची शाळा घेणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच एकूण १० सदस्यांवर घराबाहेर जाण्यासाठी टांगती तलवार आहे. तजिंदर बग्गा, मुस्कान बामने, रजत दलाल, चाहत पांडे, श्रुतिका अर्जुन, हेमा शर्मा, शिल्पा शिरोडकर, करण वीर मेहरा, एलिस कौशिक आणि अविनाश मिश्रा या १० सदस्यांपैकी कोण एलिमिनेट होणार? हे येत्या ‘वीकेंड वार’ला पाहायला मिळणार आहे.