Samay Raina And Amitabh Bachchan Video Viral: काही दिवसांपूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’च्या १६व्या पर्वात सोशल मीडियावरील लोकप्रिय इन्फ्लुएन्सर सहभागी झाले होते. भुवन बाम, समय रैना, तन्मय भट्ट, कामिया जानी हे हॉट सीटवर बसले होते. या चौघांनी हॉट सीटवर बसून कठीण प्रश्नांची उत्तर देत महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर मस्ती केली. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या समय आणि बिग बींच्या एका व्हिडीओची चर्चा खूप रंगली आहे. या व्हिडीओमध्ये समय अमिताभ यांची वैयक्तिक आयुष्यावरून खिल्ली उडवताना दिसत आहे. पण समय आणि बिग बींचा या व्हिडीओमागचं नेमकं सत्य जाणून घ्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘कौन बनेगा करोडपती’च्या १६पर्वात सहभागी झाल्यानंतर समय रैनाने अमिताभ बच्चन यांच्यासमोर अनेक विनोद केले. त्यामुळे अमिताभ बच्चनदेखील म्हणाले की, या कार्यक्रमात मी आतापर्यंत सर्वात जास्त हसलो आहे. पण, यावेळी आणखी एक विनोद समय रैनाने अमिताभ बच्चन यांना ऐकवला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये समय रैना अमिताभ बच्चन यांना विचारतो, “सर, मी तुम्हाला एक विनोद ऐकवू शकतो का?” तर बिग बी म्हणतात, “जरूर ऐकवं.” तेव्हा समय विचारतो, “तुमच्यात आणि वर्तुळात काय साम्य आहे?” अमिताभ बच्चन विचारतात, “काय?” तर समय म्हणतो, “तुमच्या दोघांकडे रेखा नाहीये.” हे ऐकून बिग बी जोरजोरात हसताना दिसत आहेत.

पण, समय रैना आणि अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ फेक आहे. एआयच्या मदतीने हा व्हिडीओ तयार केला आहे. अमिताभ बच्चन यांचे जुने व्हिडीओ आणि समयचा आवाज एकत्र करून हा डीपफेक व्हिडीओ केला आहे. टेलिकास्ट झालेल्या भागामध्ये समयने अशाप्रकारे कोणताही विनोद केलेला नाही.

दरम्यान, हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींना डीपफेकला सामोरं जावं लागलं आहे. याआधी दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, रश्मिका मंदाना अशा अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. समय रैना आणि बिग बींच्या या व्हिडीओचं ताज उदाहरण आहे. पण, अजूनपर्यंत या व्हिडीओवर समय किंवा अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.