छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. हास्यजत्रेतील हास्यवीर विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. हास्यजत्रेमुळे अभिनेता समीर चौघुलेंच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. नुकतीच हास्यजत्रेच्या कलाकारांनी राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी समीर चौघुले यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या पहिल्या दिवसाच्या शुटिंगचा किस्सा सांगितला आहे.
समीर चौघुले म्हणाले, “शुटिंगच्या पहिल्याच दिवशी माझी आणि विशाखाच्या जोडीची स्किट होती. या अगोदर आम्ही एकत्र काम केलं होतं पण आम्ही एकत्र चांगलं वाटू किंवा लोकांना आवडू हे गोस्वामी सरांना सूचल होतं. कारण जिथं विसंगती किंवा ओबडधोबडपणा आहे तिथं अशा जोडी चालून जातात. गौरव आणि वनिताची जोडी प्रेक्षकांना का आवडली कारण त्या दोघांमध्ये काहीतरी वेगळपण आहे.”
चौघुले पुढे म्हणाले, “आम्ही या अगोदर काम केली होती. पण वनिता, गौरव त्यावेळी ज्युनिअर होती. त्यांची स्पर्धा असायची आणि आम्ही त्यांना मार्गदर्शन करायचो. वनिता आत्ता जरी हसत असली तरी पफॉर्मंसच्या अगोदर वनिताचा चेहरा आणि जर त्यात काही चूक झाली तर तिची अवस्था मी जवळून बघितली आहे. मी, विशाखा, नम्रता, प्रसाद खांडेकर आम्हाला एलिमिनेशन नव्हतं पण बाकिच्यांना एलिमिनेशन होतं. त्यामुळे पहिल्याच दिवसांपासून या सगळ्यांवर प्रेशर होत की आज चांगल नाही केलं तर तुम्हाला घरी बसावं लागणार याच टेन्शन होतं. सुरुवातीला या सगळ्यांनी दिवसातले १० तास काम केलं आहे. १५ मिनिटांच्या स्किटसाठी सगळेजण दिवसभर मेहनत घेत असतात.”