एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे हे कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे त्यांचं नाव प्रसिद्धीझोतात आलं. त्यानंतर ते सातत्याने चर्चेत राहिले. आता नुकतंच त्यांनी लोकप्रिय मराठी चॅट शो ‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये हजेरी लावली. यावेळी समीर यांना पत्नी क्रांती रेडकरबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी तिचे कौतुक केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता अवधूत गुप्तेच्या ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात समीर वानखेडे यांना त्यांच्या कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. संकटाच्या वेळी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणारी अनुरुप जोडीदार तुम्हाला क्रांतीच्या रुपाने मिळाली. पण समजा कधी मित्रांबरोबर असताना किंवा पार्टीतून घरी यायला उशीर झाला तर तुमच्यावर होम मिनिस्टर चौकशी बसवतात का आणि दोषी ठरलात तर शिक्षा काय असते, असे अवधूतने यावेळी विचारले.
आणखी वाचा : पाच वर्षांनी क्रांती रेडकरने दाखवला मुलींचा चेहरा, म्हणाली “त्या दोघी ९५ टक्के…”

त्यावर समीर वानखेडे म्हणाले, “मी पार्टी करत नाही. माझे फक्त दोन-तीन मित्र आहेत. मी त्यांच्याबरोबर सहसा कुठे जास्त जात नाही. मी अनेकदा घरी उशीरा येतो, कधी कधी तर येतंही नाही. फक्त ज्यावेळी हातात केस असते, तेव्हा हे होतं.”

“क्रांती ही फार समजुतदार आहे. ती कधीही आरडाओरड, राग अशा कोणत्याही गोष्टी करत नाही. याबाबतीत मी खूपच भाग्यवान आहे, असं मला वाटतं”, असेही समीर वानखेडेंनी यावेळी सांगितले.

आणखी वाचा : “तुमचा नवरा कोणत्या…”, अभिनेत्री क्रांती रेडकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांची लव्हस्टोरी फारच हटके आहे. ते दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. वयाच्या १७ व्या वर्षापासून ते दोघे मित्र आहेत. ते दोघेही अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी अत्यंत साधेपणाने लग्नगाठ बांधली. क्रांती रेडकरने २०१८ मध्ये दोन जुळ्या मुलींना जन्म दिला होता. झिया आणि झायदा अशी त्यांची नावं आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer wankhede talk about wife and actress kranti redkar never angry watch video nrp