एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे नाव गेली दोन वर्षे खूप चर्चेत राहिलं. अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्या क्रूझवर छापेमारी समीर वानखेडे व त्यांच्या टीमने केली होती. हेच समीर वानखेडे ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोच्या आगामी एपिसोडमध्ये हजेरी लावणार आहे. यावेळी त्यांनी ड्रग्ज आणि सेलिब्रिटींच्या तपासणीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली.

पाच वर्षांच्या संसारानंतर प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडपं होणार आई-बाबा; समुद्रकिनारी केलेलं फोटोशूट चर्चेत

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
Sunil Pal reveals kidnapping details
Comedian Sunil Pal: बेरोजगारांनी केलं कॉमेडियन सुनील पाल यांचं अपहरण; खंडणीच्या पैशांतून सोनं घेतलं, २० हजार देऊन पाल यांना सोडलं

‘खुपते तिथे गुप्ते’ शोमधील काही प्रोमो इन्स्टाग्रामवर प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यामध्ये अवधूत गुप्तेने विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं समीर वानखेडेंनी दिली. ‘सेलिब्रिटींना विमानतळावर सर्वात जास्त भीती समीर वानखेडे या नावाची वाटायची. खूप लोक म्हणायचे की वानखेडे मुद्दाम सेलिब्रिटींची जास्त तपासणी करायला लावतात,’ असं अवधूतने विचारलं.

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेतील अंजीला वाढदिवशी बॉयफ्रेंडने केलं प्रपोज, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

उत्तर देत समीर वानखेडे म्हणाले, “माझ्यासाठी सेलिब्रिटी बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ आणि एपीजे अब्दुल कलाम आहेत. एअरपोर्टवर असताना जवळपास साडेतीन हजार केसेस होत्या. त्यापैकी तुमच्या भाषेत ज्यांना तुम्ही सेलिब्रिटी वगैरे म्हणता ते किती असतील, फक्त ५०, १००, १५०. बाकीचे लोक कोण आहेत? बाकीचे लोक हे गंभीर गुन्हेगार, ड्रग पेडलर्स असतात. त्यांच्याबद्दल कुणीच काही सांगत नाही.”

अवधूत गुप्तेने समीर वानखेडेंना दुसरा प्रश्न विचारला. ‘ड्रग्जसारख्या गोष्टींना आपल्या देशातील लोक अजुनही गांभीर्याने घेत नाहीत, हे खुपतं का?’ या प्रश्नावर समीर म्हणाले, “आपलं शरीर हे देवासारखं, एका मंदिरासारखं स्वच्छ आहे. ड्रग्जचे सेवन करून तुम्ही फक्त तुमच्या शरीराचंच नुकसान करत नाही तर राष्ट्राचंही नुकसान करता. हेच पैसे तुमच्या देशाच्या विरोधातील कारवाईसाठी, आपल्या आर्मीवर, आपल्या पोलिसांवर हल्ला करण्यासाठी वापरले जातात. मला देशातील तरुणांना हेच सांगायचं आहे की तुम्ही त्यासाठी जे पैसे देता ते आपल्या शत्रूंकडे जातात. त्यामुळे आपण हे थांबवायला हवं.”

दरम्यान, एक चर्चेतले सरकारी अधिकारी ‘खुपते तिथे गुप्ते’ शोच्या पुढील एपिसोडमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे ते या मुलाखतीत आणखी काय खुलासे करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Story img Loader