‘बिग बॉस मराठी’चं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यंदाच्या पर्वात ‘स्प्लिट्सविला’ फेम समृद्धी जाधवही सहभागी झाली होती. चौथ्या पर्वातील पहिल्या कॅप्टन्सीपदाचा बहुमान तिने मिळवला होता. ‘बिग बॉस’च्या घरात ती दोनदा कॅप्टन बनली होती. परंतु, गेल्या आठवड्यात समृद्धीचा बिग बॉस मराठीमधील प्रवास संपला आणि ती खेळातून बाहेर पडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समृद्धीने बाहेर आल्यानंतर ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ‘बिग बॉस’च्या टीमवर गंभीर आरोप केले आहेत. समृद्धी म्हणाली, “मी घरातील स्ट्रॉंग खेळाडूंपैकी एक होते. त्यामुळे एवढ्या लवकर घरातून बाहेर पडेन, अशी अपेक्षा नव्हती. मी सगळ्या टास्कमध्ये उत्तम खेळली आहे. टास्कदरम्यान स्ट्रॅटेजी व प्लॅनिंगही मी केलेली आहेत. परंतु, दुर्देवाने माझ्या प्रयत्नांकडे कोणाचचं लक्ष गेलं नाही”.

हेही वाचा>> “गेली अनेक वर्ष…” प्रथमेश परबच्या वाढदिवशी त्याच्या कथित गर्लफ्रेंडने केलेली पोस्ट चर्चेत

हेही वाचा>> “मी शेवटपर्यंत पत्नीधर्म निभावला पण…” मानसी नाईकचा वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

पुढे ‘बिग बॉस’ टीमवर नाराजी व्यक्त करत समृद्धी म्हणाली, “मी एक क्लासिकल गायक आहे. मी रोज घरात गाणं गायचे. परंतु, हे कधीच प्रेक्षकांना दाखवलं गेलं नाही. हे पाहून मी आश्चर्यचकित झाले आहे. माझी सकारात्मक बाजू बिग बॉस टीमकडून कधीच दाखवली गेली नाही. घरातील फक्त काहीच लोकांना दाखवण्याचा निर्णय टीमने घेतला आहे. इतर स्पर्धकही या खेळासाठी खूप प्रयत्न करत आहेत. परंतु, त्यांचे घरातील सीन्स दाखवले जात नाही आहेत. हे चुकीचं आहे”.

हेही वाचा>> Drishyam 2 Box Office Collection: अजय देवगणच्या ‘दृश्यम २’चा बॉक्स ऑफिसवर डंका, दहा दिवसांत जमवला २०० कोटींचा गल्ला

“तेजस्विनी व मी एका टास्कमध्ये जखमी झालो होतो. पण स्क्रीनवर फक्त तेजस्विनीच्या हाताला दुखापत झाल्याचं दाखवलं गेलं. माझ्या पायालाही तेव्हा दुखापत झाली होती. बाहेर आल्यावर हे सगळं बघून मला धक्का बसला आहे. बिग बॉसच्या टीमने असं का केलं, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे”, असंही पुढे समृद्धी म्हणाली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samruddhi jadhav alleged bigg boss marathi 4 team said they didnt showcase my talent kak