Colors Marathi New Serial : ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर लवकरच ‘दुर्गा’ नावाची नवी मालिका सुरू होतं आहे. काही दिवसांपूर्वी या नव्या मालिकेची घोषणा झाली. त्यानंतर नुकतंच नव्या मालिकेची सुरू होण्याची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. ‘दुर्गा’ या नव्या मालिकेत प्रसिद्ध कवी, गायक संदीप खरे ( Sandeep Khare ) यांची मुलगी पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने संदीप खरे यांनी सोशल मीडियावर छान पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कवी, गायक संदीप खरे ( Sandeep Khare ) यांची मुलगी रुमानी खरे हिने ‘तू तेव्हा तशी’ मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. ‘झी मराठी’च्या या लोकप्रिय मालिकेत रुमानीने राधा भूमिका खूप उत्कृष्टरित्या साकारली होती. तिला या भूमिकेसाठी पुरस्कारने गौरविण्यात आलं होतं. आता रुमानी ‘कलर्स मराठी’च्या ‘दुर्गा’ या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत तिने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. २६ ऑगस्टपासून संध्याकाळी ७.३० वाजता ‘दुर्गा’ मालिका प्रसारित होणार आहे. मालिकेचा नवा प्रोमो शेअर करत संदीप खरेंनी लेकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा – Video: बाबा रणबीर कपूरचा बोट पकडून राहाने पाहिलं नवं घर, व्हिडीओ झाले व्हायरल

संदीप खरेंनी काय लिहिलेलं आहे? वाचा

संदीप खरे ( Sandeep Khare ) यांनी लिहिलं आहे, “लाडक्या लेकीची दुसरी मालिका…. प्रमुख भूमिका असलेली…अगदी तिच्या भूमिकेचंच नाव मालिकेला दिलेलं…’कसं वाटतंय ‘ हा अत्यंत नॉनसेन्स प्रश्न अनेकदा खूप चुकीच्या वेळी विचारला जातो…मला आत्ता कोणी विचारला तर मला ओड नाही वाटणार पण खरं सांगू… शब्दात सांगता येणंही खरंच नाही जमणार.”

“अगदी परवापर्यंत तर एवढीशी होती आणि आता मारे शूटिंग, प्रवास, उलट सुलट शेड्यूलस, सगळं सांभाळत आम्हालाच सांगत असते की ‘चील, बाबा!’ आणि मग जेव्हा घरी येते तेव्हा सगळं बाजूला ठेवून तशीच धमाल पण करते. आम्ही आई बाबा…लेकीचं कौतुक वाटणारच…पण तिच्या पहिल्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेपासून आत्ताच्या या प्रोमोपर्यंत साऱ्यांचंच उदंड प्रेम, आशीर्वाद तिला लाभतायत. या दुसऱ्या मालिकेलाही तुमचे आशीर्वाद, कौतुक तिला लाभेल असा विश्वास आहे. एक गंम्मत मात्र वाटते…तिच्या शांत, शहाण्या, समंजस स्वभावाला ‘दुर्गा’ नाव असलेली भूमिका मिळावी हा योगायोग फारच मजेशीर आहे. मालिका जरूर पाहा… तुमचे अभिप्राय महत्वाचे आहेत,” असं संदीप खरे ( Sandeep Khare ) यांनी लिहिलं आहे.

हेही वाचा – Video: “वाटाण्याचा गोल दाना…”, ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील कलाकारांचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ

दरम्यान, ‘कलर्स मराठी’च्या ‘दुर्गा’ नव्या मालिकेत रुमानी खरेसह अभिनेता अंबर गणपुळे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तसंच शिल्पा नवलकर, राजेंद्र शिसातकर, नम्रता प्रधान महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. आपल्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाच्या प्रतिशोधासाठी लढणाऱ्या मुलीची कथा ‘दुर्गा’ मालिकेत पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandeep khare wrote a special post on daughter roomani khare new serial durga pps