Arbaz Patel Eliminated from Bigg Boss Marathi 5 :’बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व खूपच रंजक वळणावर पोहोचले आहे. मागच्या आठवड्यात निक्कीला कानाखाली मारल्याप्रकरणी आर्याला निष्कासित करण्यात आलं, तर वैभव कमी मतं मिळाल्याने घराबाहेर गेला होता. त्यानंतर टास्कमध्ये झालेल्या दुखापतीमुळे या आठवड्यात संग्राम चौगुले फक्त १४ दिवसांत बिग बॉसच्या घराबाहेर पडला. त्याच्यापाठोपाठ नॉमिनेट असलेला अरबाज पटेल कमी मतं मिळाल्याने एलिमिनेट झाला.

अरबाज पटेलच्या एलिमिनेशनची सध्या जोरदार चर्चा आहे. वर्षा उसगांवकर, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अरबाज पटेल व निक्की तांबोळी हे या आठवड्यातील पाच नॉमिनेटेड सदस्य होते. यापैकी इतर तिघे सेफ झाले आणि सर्वात शेवटी निक्की व अरबाज डेंजर झोनमध्ये होते, त्यापैकी अरबाजला निक्कीपेक्षा कमी मतं मिळाली आणि तो बिग बॉसच्या घराबाहेर गेला. त्याच्या एलिमिनेशननंतर संग्राम चौगुलेने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Bigg Boss Marathi: अरबाज पटेल घराबाहेर पडल्यावर निक्कीच्या अकाउंटवरून पहिली पोस्ट, नेटकरी म्हणाले…

“मी तर बिग बॉसच्या घरातून बाहेर आलो, पण ज्यासाठी मी त्या घरात आलेलो ते काम तर झालं. त्यानी त्याच्या स्वतंत्र गेमवर जास्त फोकस नाही केलं, म्हणून काल त्याचं एलिमिनेशन झालं,” असं कॅप्शन देत संग्रामने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटरून शेअर केला आहे. संग्राम सध्या रुग्णालयात आहे व त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असं व्हिडीओत दिसतंय.

 Bigg Boss Marathi: अरबाज पटेल घराबाहेर पडल्यावर त्याच्या गर्लफ्रेंडची पोस्ट चर्चेत; शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

तुमची इच्छा पूर्ण झाली – संग्राम

व्हिडीओत दिसतंय की संग्राम टीव्हीवर बिग बॉस पाहत आहे. “मित्रांनो, ज्या कामासाठी तुम्हाला वाटत होतं की मी आत जायला पाहिजे, ते काम झालं. माझा हात फ्रॅक्चर झाला आहे, पण शेवटी तुम्हाला जे वाटत होतं की अरबाज बाहेर जायला पाहिजे होता, ते झालं. तो माझ्या एलिमिनेशनमुळे बाहेर गेला आहे. बी टीमला हे पटणार नाही, पण तुमची जी इच्छा होती की ती पूर्ण झाली,” असं संग्राम म्हणाला.

Bigg Boss Marathi – “बिग बॉसने निक्कीला गुलीगत धोका…”, अरबाज Eliminate झाल्यावर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस; वाचा भन्नाट प्रतिक्रिया

अरबाजविषयी मनात वाईट नाही – संग्राम

“अरबाजविषयी माझ्या मनात काही वाईट नाही. पण तो स्वतःमुळेच बाहेर गेला आहे. तो त्याचा गेम खेळला असता तर नक्कीच तो आत असता. तुमची इच्छा पूर्ण झाली आहे. पण मला त्यासाठी माझा हात फ्रॅक्चर करून घ्यावा लागला आहे. अरबाज तुला भविष्यासाठी शुभेच्छा. तू चांगला खेळाडू आहेस पण स्वतःच्या मतांवर हा गेम तू खेळला असतास तर नक्कीच जिंकू शकला असता. भविष्यासाठीही लक्षात ठेव, आपण दुसऱ्यांच्या मताप्रमाणे खेळलो, त्यातही ती लोक प्रेक्षकांना आवडत नसतील तर मग नेहमी असंच होतं,” असं संग्राम म्हणाला.