मराठीसह हिंदी मालिकाविश्वात आपल्या सहजसुंदर अभिनयाने छाप उमटवणारी अभिनेत्री खुशबू तावडे हिचा आज वाढदिवस आहे. डोंबिवलीत जन्म झालेल्या खुशबूने बीएससीमधून शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. ‘एक मोहोर अबोल’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘देवयानी’, ‘आम्ही दोघी’, ‘सारं काही तिच्यासाठी’ अशा अनेक मराठी-हिंदी मालिकेत विविधांगी भूमिका साकारणारी खुशबू आता लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वी तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली होती. आज वाढदिवसानिमित्ताने खुशबूवर चाहत्यांसह इतर कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. खुशूबचा पती म्हणजेच अभिनेता संग्राम साळवीने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा अनोख्या अंदाजात दिल्या आहेत.

अभिनेत्री खुशबू तावडे व संग्राम साळवीची भेट पहिल्यांदा ‘देवयानी’ मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यानंतर दोघं चांगले मित्र झाले आणि मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. २०१८मध्ये खुशब व संग्राम लग्नबंधनात अडकले. त्यानंतर २ नोव्हेंबर २०२१ रोजी दोघं पहिल्यांदा आई-बाबा झाले. खुशबूने एका गोंडस मुलाला जन्म दिला; ज्याचं नाव राघव आहे. आता लवकरच पुन्हा एकदा खुशबू व संग्राम आई-बाबा होणार आहेत. आज खुशबूच्या वाढदिवसानिमित्ताने संग्रामने तिला शुभेच्छा देत तिचे आभार मानले आहेत.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
shivali parab mother emotional after seeing the look of Mangla movie
‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”

हेही वाचा – विशाखा सुभेदारचा मुलगा पुढील शिक्षणासाठी निघाला परदेशात, भावुक होत म्हणाली, “आज आमचा अबू…”

Sangram Salvi and Khushboo Tawde

अभिनेता संग्राम साळवीने खुशबूबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, “खुशूब वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझी मिठी, तुझी किस, तुझा पाठिंबा, तुझा सल्ला, तुझा संयम, तुझं प्रेम, तुझं सुंदर मन, तुझं ऐकणं, तुझा दयाळूपणा, तुझी सुंदर आठवणी तयार करण्याची क्षमता, तुझं सौंदर्य, तुझा काळजी घेणारा स्वभाव, तुझी निष्ठा, तुझं हसणं, तुझा आश्वासक आवाज, तुझं प्रोत्साहन, अशा सगळ्या गोष्टींसाठी तुझे आभार.” संग्रामच्या या पोस्टवर चाहत्यांनी खुशबूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: “वैभव आतापर्यंत ‘बिग बॉस’मध्ये बॉडीमुळे आहे”, निक्की तांबोळीचं विधान, अरबाजला म्हणाली…

हेही वाचा – “निक्कीने बिग बॉसला विकत घेतलं आहे…”, मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “रितेश देशमुख काही बोलले नाही तर…”

दरम्यान, अलीकडे खुशबूने गरोदर असल्यामुळे ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका सोडली. या मालिकेत खुशबूने उमाची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. आता उमाच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी वैद्य पाहायला मिळत आहे.

Story img Loader