मराठमोळा अभिनेता संग्राम समेळ ‘योग योगेश्वर जय शंकर’ मालिकेत शंकर महाराजांची भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे तो त्याच्या कुटुंबापासून व पत्नीपासून तब्बल ९ महिने दूर होता. आता इतक्या महिन्यांनी तो घरी परतला. संग्राम व श्रद्धा दोघेही पुन्हा भेटले असून त्याने स्वागताचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Video: दिल्ली मेट्रोत अभिनेत्रीचे कडाक्याचे भांडण, प्रवाशाला मारहाण करत केली शिवीगाळ, CISF जवान पोहोचला अन्…

Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Tarak Mehta Fame Mandar Chandwadkar Wife
‘तारक मेहता…’ फेम आत्माराम भिडेच्या पत्नीला पाहिलंत का? ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत साकारतेय भूमिका, म्हणाली…
Reshma Shinde
Video: सुंदर सजावट अन् फुलांची उधळण; रेश्मा शिंदेने शेअर केला हळदीचा व्हिडीओ
Sharayu Sonawane
Video : ‘पारू’ फेम अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ; श्वेता खरात कमेंट करत म्हणाली…
devoleena bhattacharjee blessed with baby boy
Video: दोन वर्षांपूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न; अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन
Devmanus Fame Kiran Gaikwad and Vaishnavi kalyankar wedding full video out
Video: ‘देवमाणूस’ फेम किरण गायकवाड झाला सावंतवाडीचा जावई, लग्नाचा पूर्ण व्हिडीओ आला समोर; म्हणाला, “प्रपोज नाही थेट लग्नाची घातलेली मागणी…”
Purva Shinde
‘पारू’ फेम पूर्वा शिंदेने किरण गायकवाड व वैष्णवी कल्याणकरच्या लग्नातील शेअर केला व्हिडीओ, म्हणाली…

संग्रामने शेअर केलेल्या या व्हिडीओत त्याची पत्नी श्रद्धा त्याचं घरात स्वागत करताना व ओवाळताना दिसत आहे. “९ महिन्यांच्या लाँग डिस्टन्स रिलेशनशिपनंतर, ९ महिने कुटुंबापासून दूर राहिल्यानंतर, ९ महिन्यांच्या चढ-उतारानंतर असं स्वागत झालं. या काळातील सर्व चढ-उतार आणि वळणांवर ती मजबूत राहिली. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो,” असं कॅप्शन त्याने व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, संग्राम समेळने आतापर्यंत ‘ललित २०५’, ‘बापमाणूस’, ‘आनंदी’ अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच ‘स्वीटी सातारकर’, ‘विकी वेलिंगकर’ यांसारख्या चित्रपटात त्याने अभिनय केला. २०२१ मध्ये संग्राम दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. त्याने श्रद्धा फाटकशी दोन वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली.

Story img Loader