मराठमोळा अभिनेता संग्राम समेळ ‘योग योगेश्वर जय शंकर’ मालिकेत शंकर महाराजांची भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे तो त्याच्या कुटुंबापासून व पत्नीपासून तब्बल ९ महिने दूर होता. आता इतक्या महिन्यांनी तो घरी परतला. संग्राम व श्रद्धा दोघेही पुन्हा भेटले असून त्याने स्वागताचा व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Video: दिल्ली मेट्रोत अभिनेत्रीचे कडाक्याचे भांडण, प्रवाशाला मारहाण करत केली शिवीगाळ, CISF जवान पोहोचला अन्…

संग्रामने शेअर केलेल्या या व्हिडीओत त्याची पत्नी श्रद्धा त्याचं घरात स्वागत करताना व ओवाळताना दिसत आहे. “९ महिन्यांच्या लाँग डिस्टन्स रिलेशनशिपनंतर, ९ महिने कुटुंबापासून दूर राहिल्यानंतर, ९ महिन्यांच्या चढ-उतारानंतर असं स्वागत झालं. या काळातील सर्व चढ-उतार आणि वळणांवर ती मजबूत राहिली. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो,” असं कॅप्शन त्याने व्हिडीओला दिलं आहे.

दरम्यान, संग्राम समेळने आतापर्यंत ‘ललित २०५’, ‘बापमाणूस’, ‘आनंदी’ अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच ‘स्वीटी सातारकर’, ‘विकी वेलिंगकर’ यांसारख्या चित्रपटात त्याने अभिनय केला. २०२१ मध्ये संग्राम दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला. त्याने श्रद्धा फाटकशी दोन वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangram samel meet family wife after 9 months long distance relationship for yogyogeshwar jai shankar serial hrc