Sanjay Dutt : अलीकडच्या काळात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी नव्या व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवल्याचं पाहायला मिळालं. सलमान खानची बहीण अर्पिता, मलायका अरोरा, भूमी पेडणेकर, शिल्पा शेट्टी या सगळ्या सेलिब्रिटींनी फूड इंडस्ट्रीत पदार्पण करत स्वत:चं आलिशान रेस्टॉरंट सुरू केल्याचं पाहायला मिळालं. तर, अनेक सेलिब्रिटींनी स्वत:चे मेकअप व कपड्यांचे ब्रॅण्ड देखील सुरू केले आहेत. आता अभिनय क्षेत्राच्या बरोबरीने व्यवसायाकडे वळणाऱ्या कलाकारांच्या यादीत बॉलीवूडच्या ‘संजू बाबा’चं नाव देखील जोडलं आहे. संजय दत्तने वयाच्या ६५ व्या वर्षी दुबईत एक नवीन व्यवसाय सुरू केलाय याबद्दल जाणून घेऊयात…
संजय दत्त ( Sanjay Dutt ) व त्याची पत्नी मान्यता दत्त यांनी मिळून दुबईत नवीन रेस्टॉरंट सुरू केलंय. त्यांच्या नव्या व्यवसायाचं नाव खूपच हटके आहे. ‘दत्तफ्रँकटी’ ( duttsfranktea ) या नावाने संजयने दुबईत स्वत:चं रेस्टॉरंट सुरू केलंय. अभिनेत्याच्या पत्नीने सोमवारी यासंदर्भात पोस्ट शेअर करत सर्वांना माहिती दिली आहे.
हेही वाचा : लोकप्रिय अभिनेत्याने सोडली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका! आता ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका, जाणून घ्या…
संजय दत्तवर बॉलीवूडमधून शुभेच्छांचा वर्षाव
मान्यता लिहिते, “आमच्या आवडत्या चविष्ट घरगुती रेसिपीज आता लवकरच आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. खाद्यप्रेमींना याठिकाणी त्यांच्या आवडत्या रोल्सचा गरमागरम चहाबरोबर आस्वाद घेता येणार आहे.” संजयची पत्नी मान्यताने लिहिलेल्या पोस्टवरून आणि शेअर केलेला व्हिडीओ पाहून या दोघांच्या रेस्टॉरंटमध्ये खवय्यांना फ्रँकीसारख्या रोल्सचा आस्वाद घेता येईल हे स्पष्ट होत आहे.
संजय दत्तला ( Sanjay Dutt ) त्याच्या या नव्या व्यवसायासाठी संपूर्ण बॉलीवूडमधून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सलमान खान, अजय देवगण, अर्जुन कपूर, मोहनलाल यांनी संजयच्या नव्या व्यवसायाच्या व्हिडीओची झलक इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत दत्त कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, संजय दत्तच्या ( Sanjay Dutt ) कामाबद्दल सांगायचं झालं, १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी’ चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर काही वर्षांनी करिअरसह वैयक्तिक आयुष्यात संजय दत्तने अनेक चढउतार अनुभवले. २०१८ मध्ये त्याच्या बायोग्राफीवर आधारित ‘संजू’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामुळे त्याच्या आयुष्याची एक दुसरी बाजू सर्वांना समजली. पुढे, अभिनेत्याने ‘केजीएफ’, ‘लिओ’, ‘गुडछडी’ या चित्रपटांमध्ये काम केलं. आता लवकरच तो ‘वेलकम टू जंगल’, ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.