काही दिवसांपूर्वी मराठी सिनेसृष्टीत दोन नामवंत कलाकारांचं अपहरण झाल्याची बातमी समोर आली होती. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे व अभिनेत्री अमृता खानविलकर या दोघांचं अपहरण करण्यात आलं होतं. पण हे अपहरण कोणी आणि का केलं? हे आता स्पष्ट झालं आहे. लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘ड्रामा ज्युनिअर्स’ नवा कार्यक्रम सुरू होत आहे. याच कार्यक्रमातील बच्चे कंपनींनी संकर्षण कऱ्हाडे व अमृता खानविलकरचं अपहरण केलं होतं. याचा खुलासा ‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या नव्या प्रोमोमधून झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काल, रात्री ‘झी मराठी’च्या सोशल मीडियावर ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये परीक्षकांच्या शोधात असलेल्या बच्चे कंपनींनी संकर्षण व अमृताचं अपहरण केल्याचं पाहायला मिळत आहे. सर्व ड्रामेबाज मुलं दोघांना परीक्षण करण्यासाठी सांगत असून संकर्षण व अमृताने परीक्षणासाठी होकार दिला आहे. त्यामुळे आता ‘ड्रामा ज्युनिअर्स’चे परीक्षक म्हणून संकर्षण व अमृता पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा – मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या ‘मुंज्या’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई, दोन दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

तसंच महत्त्वाचं म्हणजे ‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ‘झी मराठी’च्या जुन्या व लोकप्रिय कलाकाराकडे देण्यात आली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्रेया बुगडे ‘ड्रामा ज्युनिअर्स’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. त्यामुळे आता ‘झी मराठी’चा हा नवा कार्यक्रम कधीपासून सुरू होणार? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: ड्रेसची लुंगी करत सोनाली कुलकर्णीचा ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी केलं फोटोशूट, म्हणाली, “बालपणीचा…”

दरम्यान, ‘ड्रामा ज्युनिअर्स’ या नव्या कार्यक्रमाची घोषणा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाली होती. त्यानंतर कार्यक्रमासाठी विविध शहरातून लहान मुलांच्या ऑडिशन्स घेण्यात आल्या. त्यामुळे आता लवकरच प्रेक्षकांना लहान मुलांच्या बहुरंगी अभिनयाची झलक पाहता येणार आहे. पण हा नवीन कार्यक्रम कोणत्या जुन्या मालिकेच्या जागी सुरू होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sankarshan karhade and amruta khanvilkar will be the judges of zee marathi program drama juniors pps