कलाक्षेत्रामध्ये काम करणं आणि हाती आलेलं काम टिकवून ठेवणं म्हणजे कलाकारांसाठी तारेवरची कसरत असते. अभिनयक्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी अनेक कलाकारांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. बरेच नकारही या मंडळींना पचवणं जड जातं. पण यामधूनच आजवर उत्तम कलाकार घडताना आपण पाहिले आहेत. त्यातीलच एक कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षण आज यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. पण यासाठी त्याला अधिकाधिक मेहनत करावी लागली.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत संकर्षणने त्याच्या अभिनयक्षेत्रातील प्रवासाबाबत भाष्य केलं. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वप्नांच्या पलिकडले’ या मालिकेमधून त्याला काढून टाकण्यात आलं होतं. याबाबत त्याने पहिल्यांदाच खुलासा केला होता. या मालिकेचं तीन दिवस चित्रीकरण केल्यानंतर तुझं काम बरोबर नाही म्हणत त्याला या मालिकेमधून वगळण्यात आलं.

tanishk vice president arun narayan
‘नैसर्गिकच्या तुलनेत कृत्रिम हिऱ्यांना अनेकांगी मर्यादा’; तनिष्कचे उपाध्यक्ष अरुण नारायण यांचे प्रतिपादन
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Justice Gawai over Laddu case
Tirupati Laddu Row : “जेवणात लाडू नसतील अशी आशा आहे”… जेव्हा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशही हास्यविनोद करतात!
‘वंचित’च्या निदर्शनांची दिशा काय?
arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
High Court asks Censor Board over the exhibition certificate of the film Emergency Mumbai print news
देशातील नागरिक मूर्ख वाटतात का ? ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शन प्रमाणपत्रावरून उच्च न्यायालयाची सेन्सॉर मंडळाला विचारणा
student wing agitation
‘वंचित’कडून महाविकास आघाडी समर्थक विचारवंत लक्ष्य
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?

आणखी वाचा – “नाटक, मराठी मालिकांमधून मला काढून टाकलं अन्…”, संकर्षण कऱ्हाडेचा मोठा खुलासा, म्हणाला, “मी त्यावेळी रडलो कारण…”

संकर्षणला त्याच्याबरोबर घडलेला हा प्रकार अजिबात आवडला नाही. त्याला खूप वाईट वाटलं. इतकंच नव्हे तर त्याला ठरलेलं मानधनही देण्यास नकार देण्यात आला. संकर्षण म्हणाला, “काम देताना मला असं सांगण्यात आलं होतं की, तुझं एका दिवसाचं मानधन १५०० रुपये असणार आहे. मला ते पैसे कॅशमध्ये मिळणार होते. तीन दिवसांनी मालिकेमधून काढल्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो. मी त्यांना म्हटलं की, मालिकेमधून मला काढलं आहे ते ठिक आहे. पण तीन दिवसांचं माझं १५०० रुपयांप्रमाणे ४५०० रुपये मानधन द्या. तेव्हा ते मला म्हणाले, नाही नाही आपलं तर एका दिवसाचं मानधन ७०० रुपये ठरलं होतं”.

आणखी वाचा – ड्रायव्हर आजारी पडल्याने संकर्षण कऱ्हाडेने चालवली होती बस, पहिल्यांदाच ‘त्या’ व्हायरल व्हिडीओबाबत म्हणाला, “रात्री दोन वाजेपर्यंत…”

“मला त्याक्षणी खूपच वाईट वाटलं. लगेच मी तीन दिवसांच्या पैश्यांचा हिशोब केला. २१०० रुपये मला मिळणार होते. २१०० रुपये त्यांनी मला पाकिटामध्ये भरुन दिले. त्यावेळी मी त्यांना म्हटलं की, इथे सेटवर माझे खूप चांगले मित्र झाले आहेत. हे २१०० रुपये ठेवा आणि त्यामधून या सगळ्यांना कायतरी खायला द्या. ते पैसेही त्यांनी माझ्याकडून परत घेतले. तुम्ही हे पैसे का परत देत आहात? असंही मला एका शब्दाने विचारण्यात आलं नाही. या प्रसंगानंतर मला आणखीनच रडू कोसळलं. पण मला असं वाटतं या गोष्टी घडलेल्या चांगल्या असतात. कोणीतरी तुम्हाला काढून टाकणं, अपमान करणं घडू शकतं. कारण वेदनेतूनच घडलेल्या गोष्टी मजेशीर असतात”. संकर्षणने हार न मानता त्याचा प्रवास व प्रयत्न सुरुच ठेवले हे खरंच कौतुकास्पद आहे.