संकर्षण कऱ्हाडे हा मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याच्या अभिनयाचे, लिखाणाचे, त्याच्या दिग्दर्शनाचे, त्याच्या कवितांचे त्याच्या सूत्रसंचालनाचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर सक्रिय राहून तो नेहमीच त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतो. आता संकर्षणची एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे. एक फोटो शेअर करत त्याने आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.
संकरषणने आज त्याचा एक फोटो पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करत त्याने ‘लोकसत्ता’कडून त्याला तरुण तेजांकित हा पुरस्कार प्राप्त झाला अशी आनंदाची बातमी चाहत्यांना दिली.
आणखी वाचा : “मोठं व्हायची इतकी घाई…” संकर्षण कऱ्हाडेचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
संकर्षणने त्याचा एक फोटो पोस्ट केला. फोटोमध्ये त्याच्या हातात ट्रॉफी दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने लिहिलं, “आनंदाची बातमी शेअर करतो…’लोकसत्ता’चा “तरुण तेजांकित’ पुरस्कार काल मला मिळाला…कला क्षेत्रात निवेदन, लिखाण, दिग्दर्शन, काव्य, गायन, अभिनय अशा वेगवेगळ्या गोष्टी प्रभावीपणे केल्याबद्दल हा पुरस्कार मिळाला.. खूप आनंद झाला मला.. आपण करतोय त्या सगळ्या कामांवर “लोकसत्ता” सारख्या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या वृत्तपत्राची बारीक नजर आहे हे खूप आनंद देणारं, जबाबदारी वाढवणारं आहे…मनापासून आभार.. तुम्हा प्रेक्षकांच्या वतीने मी हे स्वीकारतो.. खूप शुभेच्छा द्या…कायम पाठीशी राहा…”
आता त्याची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे. या पोस्टवर कमेंट करत त्याचे चाहते त्याचबरोबर मनोरंजन सृष्टीतील त्याचे मित्र मंडळी संकर्षणचं अभिनंदन करत आहेत. याबरोबर त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.