मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये उत्तम काम करणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. सध्या संकर्षण ‘नियम व अटी लागू’ नाटकामध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वीच या नाटकाच्या प्रयोगानंतर मुंबईच्या दिशेने प्रवास करतानाचा संकर्षणचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. कोथरुडवरुन लोणावळ्यापर्यंत त्याने स्वतः बस चालवली. पण हा प्रसंग नेमका काय होता? याबाबत संकर्षणने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

प्रशांत दामले यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटद्वारे संकर्षणचा बस चालवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. बस ड्रायव्हर आजारी असल्याने संकर्षणने हाती बसचं स्टेअरिंग घेतलं. याबाबत त्याने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. संकर्षण म्हणाला, “आमच्या नाटकाचे दोन प्रयोग होते. कोथरुडमध्ये दुपारी गंधर्वला आणि दुसरा प्रयोग रात्री खुद्द कोथरुडमध्ये होता. कोथरुडचा प्रयोग रात्री १२ ते १२.३०च्या दरम्यान संपला की, आम्ही सगळे जेवतो आणि मुंबईच्या दिशेने निघतो. मुबंईमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला त्याची वेगवेगळी कामं असतात”.

आणखी वाचा – चार चित्रपट करुनही काम मिळेना, शेवटी नोकरी केली पण…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “माझा पगार…”

त्यादिवशी माझे दोन सहकलाकार माझ्याबरोबर नव्हते. पण बॅक स्टेजची १६ ते १७ जणांची टीम आमच्याबरोबर होती. आम्ही जेव्हा जेवत होतो तेव्हाच आमच्या लक्षात आलं की, ड्रायव्हरची प्रकृती ठिक नाही. त्याच्या शरीरामध्ये अजिबात उर्जा नव्हती. आम्ही जेवलो पण तो जेवला नाही आणि गाडीत येऊन बसला. आम्ही गाडीमध्ये आल्यानंतर तो म्हटला की, माझ्या शरीरामध्ये ताकदच नाही. ड्रायव्हरच असं म्हटल्यावर तू गाडी चालवच आम्हाला घेऊन जा असं त्याला आपण म्हणू शकत नाही”.

आणखी वाचा – “वडिलांना हे क्षेत्र मान्य नव्हतं आणि…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “आमच्या तीन भावडांपैकी…”

“त्याला औषध आणून दिलं आणि आराम करायला सांगितला. त्यावेळामध्ये नाटकाची आमची टीम एक ते दीड तास क्रिकेट खेळलो. पण रात्रीचे दोन वाजेपर्यंतही त्यांना काही बरं वाटलं नाही. मग मी स्वतःच म्हटलं की, तुम्ही बसा मी गाडी चालवतो. मी बस चालवणार म्हटल्यावर कोणीच मला एकही प्रश्न विचारला नाही. एवढा माझ्या टीमचाही माझ्यावर विश्वास आहे. ड्रायव्हरने तोपर्यंत आराम केला होता. लोणावळ्याला पोहोचल्यानंतर ड्रायव्हरने मला म्हटलं की, दादा आता मी चालवतो गाडी तुम्ही बसा”. संकर्षणने केलेलं हे काम खरंच कौतुकास्पद आहे.