‘वादळवाट’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता संतोष जुवेकर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा मराठी मालिकाविश्वात दमदार एन्ट्री करत आहे. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चार माध्यमांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाचा ठास उमटवणारा संतोष लवकरच नव्या अवतारातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. याचा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

हेही वाचा – अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदेच्या घरावर मोठा दरोडा, ‘इतकं’ तोळं सोनं केलं लंपास अन्…

अभिनेता संतोष जुवेकर ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत पाहायला मिळणार आहे. इंद्रायणीचा पाठीराखा म्हणून संतोषची मालिकेत एन्ट्री होणार आहे. ‘इंद्रायणी’ मालिकेच्या नव्या प्रोमोमधून याचा खुलासा झाला आहे. ‘कलर्स मराठी’च्या सोशल मीडिया पेजवर हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – “लाखो लोकांची दिशाभूल…”, अयोध्येतील निकालाबद्दलच्या ‘त्या’ पोस्टवरून भडकला सोनू निगम, म्हणाला…

या प्रोमोमध्ये संजीवनी आणण्यासाठी आळंदीला निघालेल्या इंदूची शेवटची बस चुकते. त्यामुळे इंदू नाराज होते आणि म्हणते, “शेवटची बस गेली. आता आळंदीला कसं जाणार? संजीवनी कशी आणणार?” तितक्यात मागून एक आवाज येतो. “अशी कशी जाईल तुम्हाला सोडून बस. रामकृष्ण हरी”, असं म्हणतं संतोष जुवेकरची वारकरीच्या वेशात मालिकेत एन्ट्री दाखवली आहे. ‘इंद्रायणी’ मालिकेत संतोषची एन्ट्री पाहून अनेकांना आनंद झाला आहे. मालिकेचं आणि संतोषचं कौतुक करत आहेत.

हेही वाचा – “महाराष्ट्रातल्या विजयात तुमचाही वाटा…”, उद्धव ठाकरेंचा किरण मानेंना फोन, अभिनेत्याच्या डोळ्यांत आले आनंदाश्रू

हेही वाचा – Video: “प्रिय आई…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने आईला दिलं वाढदिवसाचं सरप्राइज, लिहिली खास पोस्ट

दरम्यान, संतोष जुवेकरच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी त्याच्या ‘स्ट्रगलर साला सीझन ३’चा सातवा एपिसोड प्रदर्शित झाला होता. लवकरच संतोष ‘छावा’ या हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधरित असलेल्या ‘छावा’ चित्रपटात तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यंदाच्या वर्षाखेरिस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Story img Loader