‘झी मराठी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्याला यंदा सारा अली खानने खास उपस्थिती लावली होती. पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांना सारा अली खानचा मराठमोळा अंदाज पाहायला मिळाला. यावेळी तिने लोकप्रिय बॉलीवूड गाण्यांसह “ऐका दाजिबा…” या मराठी गाण्यावर डान्स केला. याशिवाय अभिनेत्रीने खास मराठीत शायरी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सारा अली खानने या कार्यक्रमात सोनेरी काठ असलेली काळ्या रंगाची सुंदर साडी, मोठे कानातले असा हटके लूक केला होता. मंचावर येताच अभिनेत्रीने सर्वांशी मराठी भाषेत संवाद साधला.

हेही वाचा : “ते मला हातोड्याने मारायचे”, प्रसिद्ध अभिनेत्याचा वडिलांबद्दल खुलासा; म्हणाले, “ब्राह्मण असल्याने मी शेती…”

“नमस्ते दर्शको! मी सारा अली खान…मला इथे येऊन वाटतंय खूप छान, झी मराठी आहे महाराष्ट्राची शान, वडापाव आहे माझा जीव की प्राण… काय पाव्हणं आला का बाण?” अशी खास शायरी करत अभिनेत्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

हेही वाचा : शुभमंगल सावधान! क्रिती खरबंदा-पुलकित सम्राट लग्नबंधनात अडकले, शाही सोहळ्याचे फोटो आले समोर

दरम्यान, सारा अली खानने ‘केदारनाथ’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. गेल्या काही वर्षांत बॉलीवूडमध्ये तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच सारा ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटांत झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा रुपेरी पडद्यावर मांडण्यात येणार आहे. हा चित्रपट उषा मेहता यांचा बायोपिक असून यामध्ये सारा अली खान त्यांची भूमिका साकारणार आहे.