बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल ही फ्रेश जोडी लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. लवकरच हे दोघे ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटातून दोघे आपल्यासमोर येणार आहेत. सध्या हे दोघे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्याच निमित्ताने त्यांनी ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात हजेरी लावली. नुकतंच सोनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन याचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या कार्यक्रमात दोघांनी कपिल आणि त्याच्या टीमसह भरपूर धमाल केली. प्रेक्षकांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. याबरोबरच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचे किस्से आणि एकमेकांबद्दलच्या इतर धमाल गोष्टींचा खुलासा केला आहे. याच कार्यक्रमात विकीने सारा आणि तिची आई अमृता सिंह यांच्याबद्दलचा एक धमाल किस्सा सांगितला.

आणखी वाचा : ‘टीप टीप बरसा पानी’ गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान रवीना टंडनने घातलेल्या ‘या’ अटी; म्हणाली, “मी साडी सोडणार नाही आणि…”

याविषयी बोलताना विकी म्हणाला, “मी एकदा साराला अमृता सिंग यांना ओरडताना पाहिलं आहे. मी जेव्हा याबद्दल तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली, आईला काहीच अक्कल नाहीये, तिने १६०० रुपयांचा टॉवेल खरेदी केला आहे. यावरून ती अक्षरशः स्वतःच्या आईची शाळा घेत होती.”

विकीने ही गोष्ट सांगितल्यावर सारा म्हणाली, “१६०० रुपयांचा टॉवेल कोण विकत घेतं? व्हॅनिटी व्हॅनमध्ये २ ते ३ टॉवेल असेच ठेवलेले असतात तेच वापरायचे.” साराच्या या बोलण्यावर एकच हशा पिकला, विकी आणि कपिललाही हसू आवरत नव्हतं. ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट २ जूनला प्रदर्शित होणार आहे. नुकतीच या दोघांनी आयपीएलच्या अंतिम सामन्यात हजेरी लावली अन् चित्रपटाचं जबरदस्त प्रमोशन केलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sara ali khan scolded her mom amruta singh for buying costly towel says vicky kaushal avn