‘कौन बनेगा करोडपती’ चे १५ वे पर्व संपले आहे. या पर्वाच्या शेवटच्या स्पर्धक सारा अली खान आणि शर्मिला टागोर या होत्या. या आजी व नातीच्या जोडीने शोमध्ये १२.५० लाख रुपये जिंकले. त्यांनी ही जिंकलेली रक्कम चांगल्या कामासाठी दान केली. या पर्वातील शेवटचा प्रश्न हा क्रिकेटशी संबंधित होता. तो प्रश्न सारा अली खानचे आजोबा आणि शर्मिला टागोर यांचे पती मन्सूर अली खान पतौडी यांच्याबद्दल होता. या शेवटच्या प्रश्नावर सारा व तिची ‘बडी अम्मा’ म्हणजेच शर्मिला टागोर यांच्यात थोडा वाद झाला.

१२.५० लाख रुपयांचा होता प्रश्न

१२.५० लाख रुपयांसाठी अमिताभ बच्चन यांनी विचारलेला प्रश्न असा होता. ‘मंसूर अली खान पतौडी यांचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात तरुण कर्णधार होण्याचा विक्रम कोणत्या संघाच्या खेळाडूने मोडला?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. जेव्हा अमिताभ बच्चन हा प्रश्न वाचत होते आणि त्यांनी उत्तराचे पर्याय दिले नव्हते, तेव्हाच शर्मिला टागोर यांनी सारा अली खानशी अनेकदा दक्षिण आफ्रिकेचा उल्लेख केला होता. मात्र, पर्याय देण्यात आले तेव्हा त्यात दक्षिण आफ्रिकेचे नाव नव्हते.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल
aamir khan, shah rukh khan, salman khan
सलमान खान आणि शाहरुख खानबरोबर एकत्र काम करण्याच्या चर्चांवर आमिर खानची प्रतिक्रिया; म्हणाला, “आशा आहे लवकरच…”

दिग्गज अभिनेते नाना पाटेकरांचा मुलगा मल्हार काय काम करतो? जाणून घ्या

सारा आजीला काय म्हणाली?

उत्तरांसाठी ए- वेस्ट इंडिज, बी- ऑस्ट्रेलिया, सी- इंग्लंड आणि डी- झिम्बाब्वे असे चार पर्याय होते. पर्याय पाहताच शर्मिला टागोर यांनी लगेच झिम्बाब्वेचे नाव घेतले. यावर साराने त्यांना विचारलं की तुम्हाला उत्तराची खात्री आहे का? सारा म्हणाली, “याआधी तुम्ही दक्षिण आफ्रिका म्हणत होतात आणि तुम्ही अनेकदा दक्षिण आफ्रिकेचं नाव घेतलं. आता पर्यायांमध्ये ते नाव नसल्याने तुम्ही झिम्बाब्वेचे नाव घेत आहात. तुम्हाला उत्तराबद्दल खात्री आहे का?” मात्र शर्मिला टागोर झिम्बाब्वेचे नाव घेत राहिल्या.

सैफ अली खानने अवघ्या २१ व्या वर्षी अमृता सिंहशी लग्न का केलं होतं? आता तिच्याशी कसं नातं आहे? उत्तर देत म्हणाला…

शर्मिला यांनी लाइफलाइन न घेताच दिलं उत्तर

साराने अनेक वेळा विचारलं, पण शर्मिला यांनी त्यांचे उत्तर बदलले नाही. या प्रश्नाच्या वेळी सारा आणि शर्मिला यांच्याजवळ दोन लाइफलाइन होत्या. मात्र, शर्मिलांनी लाइफलाइन घेण्याचा विचारही केला नाही. सारा आणखी काही बोलण्याआधीच त्या म्हणाला की ‘डी-झिम्बाब्वेला लॉक करा’ हे ऐकून सारा थक्क झाली. लाइफलाइन न घेता आजी उत्तर देईल असं कदाचित साराला वाटलं नसावं.

बॉलीवूडचा २०२३ मधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, देशभरात कमावले फक्त १० हजार रुपये; तुम्ही पाहिलाय का?

बरोबर उत्तर नेमकं काय होतं?

अमिताभ बच्चन यांनी उत्तर सांगितल्यावर साराचा चेहरा पाहण्यासारखा होता. कारण शर्मिला टागोर यांचं उत्तर बरोबर होतं. अमिताभ बच्चन म्हणाले की तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. उत्तर ऐकल्यानंतर साराने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. आजीकडे बघून ती म्हणाली, ‘खूप छान.’ अमिताभ बच्चनही म्हणाले, ‘रिंकू दी तुम्ही छान खेळलात’. (अमिताभ शर्मिला टागोर यांना रिंकू दी या नावाने हाक मारतात).

अमिताभ बच्चन म्हणाले, “जेव्हा झिम्बाब्वेचा टटेंडा टायबू २००४ मध्ये कर्णधार झाला होता, तेव्हा त्याचे वय २० वर्षे ३५८ दिवस होते. त्याच वेळी जेव्हा मन्सूर अली खान पहिल्यांदा भारताचे कसोटी कर्णधार झाले होते तेव्हा त्यांचे वय २१ वर्षे ७७ दिवस होते.”

Story img Loader