Sara Kahi Tichyasathi Last Episode : ‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच ‘सावळ्याची जणू सावली’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या मालिकेची तारीख आणि वेळ जाहीर होताच नेमकी कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबद्दल सर्वत्र चर्चा रंगली होती. अखेर ‘सारं काही तिच्यासाठी’ ( Sara Kahi Tichyasathi ) ही वर्षभरापूर्वी सुरू झालेली मालिका एक्झिट घेणार असल्याचं समोर आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘सारं काही तिच्यासाठी’ ( Sara Kahi Tichyasathi ) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. अखेर या मालिकेत श्रीनूची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक गावकर याने यासंदर्भातील पोस्ट शेअर करत मालिका संपणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “आर्याने मला मारलं…”, म्हणत निक्की ढसाढसा रडली! घरात जोरदार राडा; थेट ‘बिग बॉस’कडे केली बाहेर काढण्याची मागणी

अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

अभिषेक गावकरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये “सारं काही तिच्यासाठी या मालिकेचा शेवटचा भाग १४ सप्टेंबर रोजी प्रसारित केला जाणार आहे. त्यामुळे ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेचे शेवटचे काही एपिसोड्स चुकवू नका. संध्याकाळी ६.३० वाजता ‘झी मराठी’ वाहिनीवर पाहत राहा ‘सारं काही तिच्यासाठी” अशी माहिती देण्यात आली आहे.

‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका गेल्यावर्षी २१ ऑगस्ट २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यानंतर आता वर्षभरानंतर म्हणजेच येत्या १४ सप्टेंबरला या मालिकेचा अखेरचा एपिसोड प्रसारित करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Video : कोकणातलं घर, भातशेती अन्…; तितीक्षा तावडेने नवऱ्याला दाखवलं निसर्गरम्य गाव अन् माहेरचं घर; पाहा व्हिडीओ

Sara Kahi Tichyasathi
अभिषेक गावकरची इन्स्टाग्राम स्टोरी ( Sara Kahi Tichyasathi )

हेही वाचा : मुहूर्त ठरला! नवरात्रोत्सवात सुरू होणार ‘स्टार प्रवाह’ची नवीन मालिका ‘उदे गं अंबे’; कोणती जुनी मालिका घेणार निरोप?

दरम्यान, ‘सारं काही तिच्यासाठी’ ( Sara Kahi Tichyasathi ) मालिकेत अशोक शिंदे, दक्षता जोईल, रुची कदम, अभिषेक गावकर, पालवी कदम, नीरज गोस्वामी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आधी या मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडे प्रमुख भूमिका साकारत होती. मात्र, ती गरोदर असल्यामुळे काही दिवसांपूर्वी खुशबूने या मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्यामुळे खुशबूच्या जागी अभिनेत्री पल्लवी वैद्यची मालिकेत वर्णी लागली होती. आता येत्या दोन दिवसांत ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Story img Loader