सावली आपल्या विनम्र स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. ‘सावळ्याची जणू सावली’ (Savlyachi Janu Savali) मालिकेतील सावली कितीही संकटे आली तरीही संयमाने त्याला सामोरी जाताना दिसते. कोणत्याही परिस्थितीत तिच्या कुटुंबाला त्रास होऊ नये याची ती काळजी घेताना दिसते. लहान भावाच्या औषधोपचारांसाठी पैसे मिळावेत म्हणून ती भैरवीच्या सांगण्यानुसार तिची मुलगी तारासाठी गाताना दिसते. भैरवीने कितीही अपमान केला तरी सावली तिचे कर्तव्य निभावण्यापासून मागे हटत नाही. आता अशा या गरीब घरातील, सावळ्या रंगाच्या मुलीचे श्रीमंत असणाऱ्या व सौंदर्याला अतिमहत्त्व असणाऱ्या घरातील सारंगबरोबर लग्न झाले आहे. हे लग्न दोघांच्याही मर्जीविरुद्ध झाले आहे. सारंगचे अस्मीवर प्रेम होते; मात्र जगन्नाथने बदला घेण्यासाठी सावली व सारंगचे लग्न लावून दिले. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये सावलीला सारंगची काळजी वाटत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा