‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू असलेली ‘लोकमान्य’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं नुकतंच समोर आलं. टीआरपीच्या अभावामुळे चॅनलने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर आता या जागी कोणती नवा कार्यक्रम सुरू होणार याचा खुलासा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘लोकमान्य’ ही मालिका लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेत अभिनेता क्षितिष दाते याने लोकमान्य टिळकांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री स्पृहा जोशीने लोकमान्य टिळकांची पत्नी सत्यभामाबाई यांची भूमिका साकारली आहे. ही मालिका अचानक बंद होणार असल्यामुळे या मालिकेचे प्रेक्षक सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत. तर आता त्या जागी सुरू होणाऱ्या नव्या कार्यक्रमाचा प्रोमो आज प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचं शिक्षण किती? दोघांची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क

‘लोकमान्य’ या मालिकेच्या जागी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो आज समोर आला. तर हा नवीन कार्यक्रम ९ ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार प्रसारित केला जाणार आहे. तर आता या नवीन व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

आणखी वाचा : स्पृहा जोशी-क्षितिष दातेची प्रमुख भूमिका असलेली ‘लोकमान्य’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, कारण आलं समोर

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चं या आधीच्या पर्वाचं परीक्षण आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत, मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड यांनी केलं होतं, तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सूत्रसंचालीकेच्या भूमिकेत दिसली. आता या आगामी पर्वाचं परीक्षण कोण करणार आणि याचं सूत्रसंचालक म्हणून कोण दिसणार हे अजून गुलदस्ता ठेवण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saregamapa lil champs new season will be taking slot of lokmanya serial rnv
Show comments