मराठी मालिकाविश्वातील सध्याची सर्वाधिक लोकप्रिय असणारी आणि टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर असणारी मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग’. या मालिकेने सुरू झाल्यापासून प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. मालिकेतील कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रत्येक पात्र उत्तमरित्या साकारलं आहे. त्यामुळेच सायली, अर्जुन, साक्षी, चैतन्य, प्रिया, पूर्णाआजी, कल्पना, मधुकर, महिपत अशी मालिकेतील सगळी पात्र घराघरात पोहोचली आहेत. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील नवीनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवल्यामुळे अजूनही मालिका टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ठाण मांडून आहे. अशा या लोकप्रिय महामालिकेचं शीर्षकगीत ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम ऋचा घांगरेकरने गायलं आहे; ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या वर्षीचं ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चं नवं पर्व खूपच गाजलं. या नव्या पर्वातील लिटिल चॅम्प्सने त्यांच्या आवाजाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. त्यापैकी एक म्हणजे ऋचा घांगरेकर. ऋचाने आवाजाबरोबरच तिच्याकडे असलेल्या ज्ञानाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशा या ऋचाने लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’चं शीर्षकगीत आपल्या सुमधूर आवाजात गायलं आहे. तिच्या गोड आवाजात ‘ठरलं तर मग’ मालिकेतलं शीर्षकगीत ऐकून नेटकरी कौतुक करत आहेत.

हेही वाचा – Video: “माझं जे काही आहे ते तूच आहेस…”, जिनिलीया देशमुखने धाकट्या लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली…

ऋचाने ‘ठरलं तर मग’चं शीर्षकगीत संगीतकार निलेश मोहरीरसाठी गायलं आहे. निमित्त देखील तितकंच खास आहे. हा व्हिडीओ शेअर करत ऋचाने शीर्षकगीत गाण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. तिने लिहिलं आहे, “निलेश दादा, तुला मिळालेल्या ‘संगीत कलारत्न’ पुरस्काराबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन. हे ऐकल्यावर मला खूप आनंद झाला, आणि लगेचंच ही पोस्ट करावीशी वाटली…मराठी मालिकांच्या विश्वात, ‘शीर्षकगीत’ ही येणाऱ्या प्रत्येक नव्या मालिकेची ओळख असते. गेली अनेक वर्षे, वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेल्या अनेक मालिकांच्या शीर्षकगीतांना तू संगीतबद्ध केलंस. तसंच, अनेक वेगवेगळ्या प्रकारची गाणी सुद्धा संगीतबद्ध केलीस. मी लहानपणापासून ही सगळी गाणी ऐकतेय. तुझं अभिनंदन करण्यासाठी, त्यातलंच एक गाणं म्हणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न…पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन दादा…”

ऋचाचं नेटकऱ्यांनी खूप कौतुक केलं आहे. “ऋचा मस्त गं”, “वाह ऋचा…खूप छान…तू जेवढी गोड गातेस तितकीच गोड बोलतेस…तुला खूप सारं प्रेम आणि अनेक आशीर्वाद”, “खूप सुंदर ऋचा”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – श्रेयस तळपदे व संकर्षण कऱ्हाडेच्या भेटीमुळे ‘माझी तुझी रेशीमगाठ २’च्या चर्चांना उधाण, भेटीमागचं नेमकं कारण काय? वाचा…

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेचं शीर्षकगीत निलेश मोहरीरने संगीतबद्ध केलं आहे. तर हृषिकेश रानडे-प्रियांका बर्वे यांनी गायलं आहे. तसंच या शीर्षकगीताच्या गीतकार रोहिणी निनावे आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saregamapa little champs fame rucha ghangrekar sing tharala tar mag serial title song pps